Amazfit Bip 5: एका चार्जवर तब्बल 10 दिवस चालेल स्मार्टवॉच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये?
Amazfit Bip 5 स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे.
Amazfit Bip 5 स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे.
बॅटरी सेव्हर मोड ऑन करून 30 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ मिळेल.
Amazfit ने एक अप्रतिम आणि आकर्षक स्मार्टवॉच बाजारात आणली आहे. Amazfit Bip 5 स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे. यात 1.91 इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. हे अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह 2.5D टेम्पर्ड ग्लाससह सुसज्ज आहे. कंपनीने दावा केला आहे की, या स्मार्टवॉचची बॅटरी 10 दिवसांपर्यंत टिकेल. या स्मार्टवॉचची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्ससह सर्व माहिती जाणून घेऊयात.
Amazfit Bip 5 ची किंमत
Amazfit Bip 5 ची किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच इ-कॉमर्स साईट Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही स्मार्टवॉच क्रीम व्हाइट, पेस्टल पिंक आणि सॉफ्ट ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येणार आहे.
Amazfit Bip 5
Amazfit Bip 5 मध्ये 2.5D टेम्पर्ड ग्लास डिस्प्ले आहे. यात अँटी फिंगरप्रिंट कोटिंग आहे. यात 1.91 इंच लांबीचा LCD टचस्क्रीन डिस्प्ले आहे. Amazfit Bip 5 मध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, रिअल-टाइम GPS ट्रॅकिंग आणि मार्ग नेव्हिगेशन सेवा देखील प्रदान केल्या आहेत. हे ब्लड ऑक्सिजन सेन्सर, हार्ट रेट ट्रॅकर आणि बायोट्रॅकर यांसारख्या अनेक स्मार्ट हेल्थ मॉनिटर्ससह येते. यामध्ये स्ट्रेस मॉनिटरिंगही करता येते. यासोबतच 70 हून अधिक वॉच फेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये अनेक मिनी Apps देण्यात आले आहेत, ज्यामध्ये 30 हून अधिक मिनी-गेम्सचा समावेश आहे.
स्मार्टवॉच फोनशी कनेक्ट करून, कॉलिंगचा आनंद घेता येईल. या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन आणि स्पीकर आहे. म्युझिक कंट्रोल, इव्हेंट रिमाइंडर, टू-डू लिस्ट, स्मार्ट नोटिफिकेशन आणि फाइंड माय फोन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Amazfit Bip 5 मध्ये 300mAh बॅटरी आहे. यासोबत 10 दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. बॅटरी सेव्हर मोड ऑन करून 30 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ मिळेल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टवॉचमध्ये 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यात सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, स्विमिंग असे मोड देण्यात आले आहेत. जर तुम्हाला जॉगिंग किंवा त्यासारख्या ऍक्टिव्हिटीज आवडत असतील आणि तुम्हाला ते ट्रॅक करायचे असेल तर स्मार्टवॉच अगदी तुमच्या कामाची आहे. यामध्ये Google Fit आणि Apple हेल्थचा सपोर्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile