Amazfit ने आपला नवीन फिटनेस बँड Amazfit Band 7 लाँच केला आहे. Amazfit Band 7 नुकत्याच लाँच झालेल्या Mi Band 7 Pro चे अपग्रेडेड वर्जन असल्याचे म्हटले जाते. मात्र, Amazfit Band 7 मध्ये Mi Band 7 Pro सारखे इन बिल्ट GPS नाही. Amazfit Band 7 मध्ये 24/7 हार्ट रेट मॉनिटरसह 1.47-इंच लांबीचा HD AMOLED डिस्प्ले मिळेल. या वॉचसोबत ब्लड ऑक्सिजन ट्रॅकरही उपलब्ध असेल.
हे सुद्धा वाचा : OTT This Week : 'रॉकेट्री' ते 'रंगबाज' पर्यंत, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात OTT वर येणार 'हे' चित्रपट आणि सिरीज
Amazfit Band 7 मध्ये 1.47-इंच लांबीचा HD AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 198×368 पिक्सेल आहे. यात Zepp OS मिळेल. त्याच्या बॅटरीबद्दल, हेवी युजमध्ये 18 दिवसांचा बॅकअप आणि बॅटरी सेव्हर मोडमध्ये 28 दिवसांचा दावा आहे. Amazfit Band 7 सह 50 वॉच फेस उपलब्ध असतील. याशिवाय यामध्ये 120 स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील.
हेल्थ फीचर्स म्हणून, या बँडमध्ये 24/7 हार्ट रेट मॉनिटर, SPO2 मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, स्ट्रेस ट्रॅकर आणि मासिक धर्म सायकल ट्रॅकर देखील मिळेल. यामध्ये हाय हार्ट रेट अलर्ट देखील मिळेल. Amazfit Band 7 अँड्रॉइड आणि iOS दोन्ही उपकरणांवर वापरता येईल. या बँडमध्ये इनबिल्ट अलेक्सा व्हॉईस असिस्टंट उपलब्ध असेल. Amazfit च्या या बँडला वॉटर रेसिस्टन्ससाठी 5 ATM रेटिंग मिळाली आहे. उपकरणाचे वजन 28 ग्रॅम आहे.
Amazfit Band 7 ची किंमत $49.99 म्हणजेच अंदाजे 3,650 रुपये आहे. हा बँड Amazfit च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येते. भारतीय बाजारपेठेत याच्या लाँचबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. हा बँड Beige आणि Black कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.