IGX कार्यक्रमात सादर झाला अॅबसेंशियाचा टेसरअॅक्ट 3D HMD

Updated on 17-Nov-2015
HIGHLIGHTS

हे डिवाईस तुम्हाला कोणत्याही प्रमुख शक्तीशिवाय डिजिटल कटेंटला 3D मध्ये रुपांतरित करण्याचे आश्वासन देतो.

अलीकडेच मुंबईमध्ये झालेल्या इंडियन गेम्स एक्स्पो(#IGX) च्या समारोपावेळी आम्ही एका स्टॉलजवळ गेलो, ज्याला काही नाव आणि नंबर नव्हता. आम्हाला थोडे चमत्कारिक वाटले. तेथे आम्हाला कॉलेजचे युवक दिसले, त्या सर्वांनी काळ्या रंगाचे टी-शर्ट्स घातले होते आणि ज्यावर  “Absentia VR” असे लिहिले होते. त्या स्टॉलजवळ उभे असलेले प्रत्येकजण अॅबसेंशियाच्या व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या अज्ञात टेसरअॅक्ट प्रोडक्टविषयी जाणून घेण्यासाठी आतूर होते. प्रत्येकाला ‘यापुढे काय’ हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.

IGX मध्ये इतर कोणत्याही बूथला एवढा प्रतिसाद मिळाला नव्हता, तेवढे ह्या नाव नसलेल्या बूथचे साक्षीदार होते. त्याच्या खोलवर शिरण्यासाठी आम्हाला एवढच पुरेसे होते आणि आम्ही सर्व अॅबसेंशिया नेमके काय काम करते हे जाणून घेण्यासही उत्सुक होतो.

गोव्याच्या BITS मधील ड्रॉपआऊट झालेल्या एक टोळीने ही कंपनी सुरु झाली. आणि ह्या अॅबसेंशियाने टेसरअॅक्ट निर्माण केलं. आपण ह्याआधी कधीही अनुभवला नाही असा चर्चात्मक, व्यस्त, आणि वैयक्तिक अनुभव आणि तोही कोणतीही चित्रे न हलवता हा डिवाईस एक चांगला अनुभव देतो. जोपर्यंत तुम्ही याआधी प्री-रिलीज झालेले ऑक्युलस रिफ्ट वापरुन पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्याचा अंदाज येणार नाही.

अॅबसेंशियाचे टेसरअॅक्ट म्हणजे एक असे HMD आहे जे तुम्हाला एका व्हर्चुअल रिअॅलिटी HMD कडून अपेक्षित आहे. जसे की ऑक्युलस रिफ्ट, सोनी प्लेस्टेशन VR, HTC Vive, Gear VR आणि HMD इतर प्रोजेक्ट ज्यावर सध्या काम सुरु आहे. (२०१६ मध्ये रिलीज होणारे), टेसरअॅक्ट हे एक काल्पनिक चष्मा आहे जो आपल्याला थेट वैज्ञानिक चित्रपटाच्याही पलीकडे घेऊन जातो. तथापि, ह्याच्या निर्माणकर्त्यांना असा विश्वास आहे की, ह्यात काही वैशिष्टपुर्ण असे घटक आहे, जे गुंतवणूकदार आणि सामान्य प्रेक्षकांसाठी महत्त्वाचे आहे.

 

टेसरअॅक्ट म्हणजे नेमके काय?

टेसरअॅक्ट HMD हे प्लॅस्टिकचे बनलेले आहे(ज्यांचा संपर्क डोक्याशी येतो) आणि त्याच्या पट्ट्या डोक्यावर बसवण्यासाठी आपण हव्या तशा अॅडजस्ट करु शकतो. त्याच्या बाजूला दोन डाईल्स आहेत ज्याने आतील लेन्सची फोकल लांबी अॅडजस्ट करु शकतो.(जवळ आणि लांब) आणि वरच्या बाजूस असलेल्या बटणाने लेन्सेस डावी किंवा उजवीकडे हलवू शकतो. हे पुर्ण सिस्टम USB ने शक्तिशाली बनविण्यात आले आहे आणि ह्यात ARM Cortex चिप वापरण्यात आली आहे. ह्या डिवाईसने पिक्सेल रिसाईज करणे आणि काल्पनिक स्टिरिओस्कोपिक 3D निर्माण करणे हे अॅबसेंशियाच्या तरुणांचा हेतू आहे.  

 

 

सध्या टेसरअॅक्ट 1080p आणि 1440p च्या चित्रांना सपोर्ट करतो. अॅबसेंशियाचा सहसंस्थापक शुभम मिश्राने सांगितले की, टेसरअॅक्टला कोणत्याही विशेष कंटेंटची गरज नाही. हे कोणत्याही अंतराशिवाय 2D चे 3D मध्ये रुपांतरित करण्यासाठी सक्षम आहे. तसेच टेसरअॅक्टविषयी अजून सविस्तर बोलताना तो आणि त्याच्या टीमने सांगितले की, ह्यातून पाहताना तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा ग्राफिक्सची गरज नाही, कारण ह्यातून सर्व व्हिज्युअल्स चांगलेच दिसतात आणि ते पाहताना डोळ्यांना एक आल्हाददायक अनुभव मिळतो.

 

 

आम्ही ह्याचा वापर करुन खूप वेळ गेम खेळलो. पण त्याचा कोणताही परिणाम आमच्या डोळ्यावर किंवा शरीरावर झाला नाही.  

 

टेसरअॅक्ट कसे काम करतो?

ह्याचे उत्तर ह्याच्या सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. अॅबसेंशियाची सहसंस्थापक आणि सॉफ्टवेअर प्रमुख वृषाली प्रसादे हिच्या म्हणण्यानुसार, हे सॉफ्टवेअर 2D इमेजेस/व्हिज्युअल्सला 3D मध्ये रुपांतरित करतो. ह्याचे सॉफ्टवेअर जे PC होस्टवर चालते, ते व्हिज्युअल सीनसाठी फ्रेम्स निर्माण करते आणि त्याचबरोबर ती माहिती HMD आणि डिस्प्ले मॉनिटरला पोहोचवते.

 

 

टेसरअॅक्टच्या 1080p व्हर्जनची किंमत १२,००० रुपये(US $180) असेल, तर टेसरअॅक्टच्या 1440p व्हर्जनची किंमत 20,000(US $ 300) असेल. मात्र अॅबसेंशिया टेसरअॅक्टला प्री-ऑर्डर केल्यास तो ४,०००रुपये (US $60) आणि ४,५०० रुपये (US $70) ह्या किंमतीत अनुक्रमे 1080p आणि 1440p व्हर्जन उपलब्ध होतील.

 

 

अॅबसेंशियाच्या टीमशी शुभम, हरिकृष्णा, वृषाली, आदित्य आणि इतर लोकांशी तसेच अॅस्टार्क व्हेंचरचे कार्यकारी निर्देशक श्री. सलील मुसळे यांच्याशी बातचीत केली असता, हा टेसरअॅक्ट CES 2016 मध्ये प्रदर्शित केला जाईल आणि त्याचबरोबर वर्षभरातील इतर कॉन्फरन्सेस आणि तंत्रज्ञानिक ग्राहकांसाठी सादर केला जाईल असे निर्दशनास आले. थोडक्यात सांगायचे झाले तर, आपल्याला अॅबसेंशियावर बारीक लक्ष ठेवावे  लागेल आणि पाहावे लागेल की येणा-या काही महिन्यात हा अजून काय प्रगती करतो ते.   

Jayesh Shinde

Executive Editor at Digit. Technology journalist since Jan 2008, with stints at Indiatimes.com and PCWorld.in. Enthusiastic dad, reluctant traveler, weekend gamer, LOTR nerd, pseudo bon vivant.

Connect On :