तुम्ही देखील Amazfit कडून कॉलिंग फिचरसह एखादी स्मार्टवॉच शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Amazfit GTS 2 ची नवीन आवृत्ती लवकरच भारतात लाँच होणार आहे. Amazfit GTS 2 च्या नवीन आवृत्तीमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, यामध्ये HD AMOLED डिस्प्ले मिळेल. ही स्मार्टवॉच Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल. Amazfit GTS 2 ची कॉलिंग आवृत्ती 10,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, ही या नवीन स्मार्टवॉचची लाँचिंग किंमत आहे. त्यानंतर या स्मार्टवॉचची किंमत 11,999 रुपये असणार आहे.
Amazfit GTS 2च्या नव्या वर्जनमध्ये 1.65-इंच AMOLED स्क्रीन आहे. ही स्मार्टवॉच मिडनाईट ब्लॅक, डेझर्ट गोल्ड किंवा अर्बन ग्रे अल्युमिनियम अलॉय केस आणि एका मॅचिंग स्ट्रॅपसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचचा डिस्प्ले ऑप्टिकल डायमंड-समान कार्बन (ODLC) आणि अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लासपासून बनविला गेला आहे, ज्यामुळे स्क्रीन असाधारणपणे मजबूत बनते आणि स्क्रॅचदेखील पडत नाही.
हे सुद्धा वाचा: भारतातील जबरदस्त रिचार्ज प्लॅन एक वर्षाच्या वैधतेसह उपलब्ध, किंमत केवळ 141 रुपये
या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला ऑल्वेज ऑन डिस्प्ले मिळणार आहे. यात हार्ट रेट मॉनिटर तसेच बायोट्रॅकर 2 PPG ऑप्टिकल सेन्सर देखील मिळतो. यामध्ये रक्तातील ऑक्सिजन ट्रॅक करण्यासाठी एक सेन्सर देखील आहे. या व्यतिरिक्त, ही वॉच स्लीप ट्रॅकिंग फिचरसह देखील येते. यात स्ट्रेस मॉनिटरिंगचीही सुविधा आहे. Amazfit GTS 2 ची नवीन आवृत्ती 90 बिल्ट-इन स्पोर्ट्स मोडसह येते. ही स्मार्टवॉच 5 एटीएमसाठी वॉटरप्रूफ आहे.
Amazfit GTS 2 मध्ये 3GB स्टोरेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही गाणीदेखील स्टोअर करून ठेवता येतील. कॉलिंगसाठी यात माइक आणि स्पीकरदेखील दिले गेले आहेत. याशिवाय या वॉचमध्ये सिक्युरिटीसाठी पासवर्डही आहे. यामध्ये अलेक्सा व्हॉईस असिस्टंटचाही सपोर्ट आहे.