Xiaomi Super Saver Sale: कंपनीच्या नव्या सेलची घोषणा स्वस्त दरात स्मार्टफोन्स आणि TV उपलब्ध, बघा Best ऑफर

Updated on 07-Jun-2024
HIGHLIGHTS

कंपनीने केली Xiaomi Super Saver Sale ची घोषणा

या सेलचा लाभ तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर घेऊ शकता.

या सेलदरम्यान तुम्ही स्मार्टफोन, TV आणि टॅबलेट मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध

तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा टीव्ही आणि टॅबलेट खरेदी करत असाल, तर Xiaomi ने तुमच्यासाठी भारी सेल आणली आहे. होय, कंपनीने Xiaomi Super Saver Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये कूपन डिस्काउंट आणि बँक ऑफर दोन्ही उपलब्ध आहेत. या सेलचा लाभ तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर घेऊ शकता. ही सेल ग्राहकांसाठी 9 जूनपर्यंत लाईव्ह होणार आहे. या सेलदरम्यान तुम्ही स्मार्टफोन, TV आणि टॅबलेट मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

स्मार्टफोन्सवरील ऑफर्स

जर तुम्ही Xiaomi चा फोन खरेदी करत असाल तर, तुम्ही Redmi A3 चा 3GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंट हा बेजट स्मार्टफोन केवळ 6,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याबरोबरच, दुसरा Redmi 13C 5G स्मार्टफोन तुम्ही केवळ 9,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, Redmi Note 12 5G चा 4GB रॅम व्हेरिएंट 2000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटनंतर 9,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर, तुम्ही Redmi Note 13 Pro फोन 24,999 रुपयांमध्ये आणि Note 13 Pro+ व्हेरिएंट 30,999 रुपयांना खरेदी करू शकता.

Redmi Note 13 Pro

टॅबलेटवरील ऑफर्स

तुम्ही या फोनमध्ये टॅबलेटदेखील स्वस्तात खरेदी करू शकता. Xiamo Pad 6 चा 128GB स्टोरेज असलेला Wi-Fi व्हेरिएंट 26,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. तर, तुम्ही Redmi Pad SE चा 128GB स्टोरेज असलेला Wi-Fi व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Redmi Smart Fire TV 32 2024

स्मार्ट TV वरील उपलब्ध ऑफर्स

  • Redmi चा 32-इंच स्क्रीन आकाराचा F-Series HD रेडी स्मार्ट LED टीव्ही 13,499 रुपयांना खरेदी करू शकता.
  • तर, तुम्ही 24,499 रुपयांना 43-इंच स्क्रीन आकाराचा Ultra HD Smart LED Fire टीव्ही खरेदी करू शकता.
  • सेलदरम्यान, तुम्ही 12,499 रुपयांमध्ये 32-इंच स्क्रीन आकाराचा Mi A-सिरीज टीव्ही खरेदी करू शकता.
  • Xiaomi X-series TV हा 50-इंच स्क्रीन आकाराचा स्मार्ट TV तुम्ही केवळ 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :