प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi चे स्मार्ट TV देखील भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. नवे Xiaomi X Pro QLED आणि Smart TV X सीरीज 2024 लाँच करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ऍडव्हान्स QLED मॉडेल्स प्रगत क्वांटम डॉट तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. याशिवाय, Xiaomi स्मार्ट टीव्हीमध्ये 4K रिझोल्यूशन देखील दिले जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Xiaomi च्या नव्या स्मार्ट TV ची किंमत-
Also Read: Infinix Hot 50 5G ची लाँच डेट जाहीर! अनेक पॉवरफुल फीचर्ससह अनेक ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल
Xiaomi Smart TV X-सीरीज 2024 43-इंच मॉडेलची किंमत 28,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, 50-इंच मॉडेलची किंमत 35,999 रुपये आणि 55-इंच मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या TV वर ICICI आणि Kotak बँकेच्या सवलतीनंतर, या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 31,999 रुपये आणि 35,999 रुपये झाली आहे.
तर, दुसरीकडे Xiaomi X Pro QLED 43-इंच मॉडेलची किंमत 34,999 रुपये इतकी आहे. तर, 55-इंच मॉडेलची किंमत 49,999 रुपये आणि 65-इंच मॉडेलची किंमत 69,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI आणि Kotak बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 7,000 रुपयांपर्यंत झटपट सूट मिळेल. ऑफर्ससह या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 29,999 रुपये, 44,999 रुपये आणि 62,999 रुपये इतकी झाली आहे.
उपलद्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Xiaomi X Pro QLED आणि Smart TV X सीरीज 2024 ची विक्री Mi.com, Amazon, Flipkart आणि Xiaomi Retail द्वारे 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
Xiaomi Smart TV X-Series 2024 मध्ये मोशन स्मूथिंग तंत्रज्ञानासह 4K डिस्प्ले आहे. यात डॉल्बी व्हिजन सपोर्ट, विविड पिक्चर इंजिन 2, 1बी कलर आणि HDR10 DCI-P3 94% कलर गॅमट आहे. टीव्ही डॉल्बी ऑडिओ आणि DTX द्वारे समर्थित 30W स्पीकर्ससह सुसज्ज आहे. X सिरीजमध्ये क्वाड कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि 2GB RAM आणि 8GB स्टोरेज उपलब्ध आहे.
बंडल केलेल्या रिमोट कंट्रोलमध्ये Netflix, Dinsi+Hotstar, Prime Video, SonyLIV आणि सर्व ॲप शॉर्टकट बटन्स समाविष्ट आहेत. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi, Bluetooth, 3X HDMI 2.1, Bluetooth 5.0, Auto Low Latency Mode आणि Chromecast यांचा समावेश आहे. नवीन मॉडेल्स अल्ट्रा-स्लिम बेझल्ससह प्रीमियम मेटल फिनिशसह येतात. हे टीव्ही पॅचवॉल यूजर इंटरफेससह Google TV OS द्वारे समर्थित आहेत आणि त्यांना Google सहाय्यक समर्थन देखील आहे.
Xiaomi X Pro QLED सीरीज या स्मार्ट TV मध्ये डॉल्बी व्हिजन, क्यूएलईडी स्क्रीन पॅनल, विविड पिक्चर इंजिन 2, मोशन स्मूथिंग तंत्रज्ञान आणि DCI-P3 94 टक्के कलर गॅमट आहे. हे टीव्ही Google TV OS वर पॅचवॉल UI आणि व्हॉइस कमांडसाठी Google असिस्टंटसह कार्य करतात. यात Netflix, Disney+Hotstar, Prime Video, SonyLiv आणि सर्व ॲप्ससाठी शॉर्टकट बटन्ससह रिमोट कंट्रोल आहे.
यात 2GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज आहे आणि टीव्हीमध्ये क्वाड-कोर कॉर्टेक्स A55 प्रोसेसर आहे. टीव्ही प्रीमियम मेटॅलिक ॲल्युमिनियम फ्रेम्स आणि सर्व-स्क्रीन डिझाइनसह येतात. यात 30W स्पीकर्ससह डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस व्हर्च्युअलएक्स आहे.