आज संध्याकाळी 5 वाजता एकदा पुन्हा सेल साठी येतील Xiaomi Mi TV 4 आणि Mi TV 4A

आज संध्याकाळी 5 वाजता एकदा पुन्हा सेल साठी येतील Xiaomi Mi TV 4 आणि Mi TV 4A
HIGHLIGHTS

Xiaomi चे हे दोन्ही टीवी तुम्ही आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून मी.कॉम वर सेल साठी उपलब्ध होणार आहेत.

Xiaomi ने काही दिवसांपूर्वी भारतात Xiaomi Mi TV 4 आणि Mi TV 4A ला लॉन्च केले होते. या टीवी वेगवेगळ्या किंमत आणि स्क्रीन साइज मध्ये लॉन्च केल्या गेल्या होत्या ज्यांना लोकांनी चांगली पसंती दिली होती. आज Flipkart, Amazon आणि Mi.Com वर दुपारी 5 वाजता या TV फ्लॅश सेल मध्ये उपलब्ध होतील. 
Mi TV 4 ची किंमत 39,999 रूपये आहे आणि हिची स्क्रीन साइज 55 इंच आहे. Xiaomi चे म्हणने आहे की हा टेलिविजन 500,000 तासांपेक्षा जास्त ऑफर करतो, ज्यात जवळपास 80 टक्के कंटेंट फ्री असेल, जो Hotstar, Voot, Voot Kids, Sony Liv, Hungama Play, Zee5, Sun NXT, ALT Balaji, Viu, TVF, आणि Flickstree सारख्या पार्टनर्स च्या माध्यमातून ऑफर केला जाईल, हा कंटेंट 15 भाषांमध्ये उपलब्ध होईल.  
स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Mi TV 4 मॉडेल मध्ये 4K रिजॉल्यूशन, HDR आणि LED डिस्प्ले आहे आणि याची रुंदी 4.9mm आहे. याचा पॅनल 178 डिग्री व्यूइंग एंगल आणि 8ms रिस्पॉन्स टाइम ऑफर करतो. हा टीवी 64 बिट क्वॉड कोर एम्लॉजिक कॉर्टेक्स A53 SoC वर चालतो आणि यात  Mali-T830 ग्राफिक्स आहे. 
हा 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज सह येतो. यात डॉल्बी+DTS सिनेमा ऑडियो सह 2 8W डक्ट इनवर्टेड स्पीकर फीचर आहे. याव्यतिरिक्त यात भारतीय बाजारासाठी शाओमी चा AI संचालित पॅचवॉल UI पण आहे. 
Xiaomi च्या Mi LED Smart TV 4A च्या दोन्ही मॉडेल 32 इंच आणि 43 इंच सेल साठी उपलब्ध होतील ज्यांची किंमत क्रमश: Rs. 13,999 आणि Rs. 22,999 आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या 43 इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले चे रेजोल्यूशन (1920×1080 पिक्सल)आहे तर 32 इंचाच्या मॉडेल च्या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे आणि या TV मध्ये फुल एचडी डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले पॅनल मध्ये 178 डिग्री व्यूइंग एंगल आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. दोन्ही Mi TV 4A मॉडेल एमलॉजिक क्वॉड कोर SoC वर चालतात. सोबतच यात 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo