शाओमी आपली एक नवीन टीवी 7 मार्चला सादर करू शकते. कारण कंपनी ने यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट वर एक काउंटडाउन पण सुरु केला आहे, जो 7 मार्चला दुपारी 3 वाजता संपणार आहे. कंपनी च्या वेबसाइट वर असलेल्या माहिती नुसार, या दिवशी कंपनी भारतात Mi TV चा एक नवीन वेरियंट सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या काही लीक्स नुसार, कंपनी या दिवशी भारतात Mi TV 4C सादर करेल आणि हिची किंमत Rs.27,999 असेल. Mi TV 4C ला चीन मध्ये अॉक्टोबर 2017 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आशा आहे की, Mi TV 4C पॅचवाल ओएस वर चालेल. जो Mi TV 4 मध्ये पण आहे. ही एक 43-इंचाची टीवी असेल जिचे रेजोल्यूशन 1920×1080 पिक्सल असेल. या सोबत अजुन काही माहिती मिळाली आहे, ज्यानुसार कंपनी 4C चा 55-इंचाचा वेरियंट पण सादर करेल.
Mi TV 4C मध्ये 1GB चा रॅम आणि 8GB ची बिल्ट-इन स्टोरेज असेल. हिच्यात क्वाड-कोर अम्लोजिक T962 प्रोसेसर पण असेल. तसेच हिच्यात ब्लूटूथ आणि वाय-फाय कनेक्टिविटी पण असेल.