शाओमी ने भारतात Rs. 13,999 मध्ये लॉन्च केला स्मार्ट टीवी
शाओमी ने काल Mi LED Smart TV 4A चे दोन वेरियंट भारतात लॉन्च केले आहेत.
Xiaomi Mi LED Smart TV 4A ला कंपनी ने काल भारतात लॉन्च केले आहे. कंपनी ने या टीवी ला दोन वेरियंट मध्ये सादर केले आहे, 32-इंच आणि 43-इंच. याच्या 32-इंच वेरियंट ची किंमत Rs. 13,999 आहे आणि याच्या 43-इंच ची किंमत Rs. 22,999 आहे. या किंमती सध्यातरी लॉन्च च्या निमित्ताने आहे. अस वाटत आहे की कंपनी ने Redmi 5A सोबत केले होते, तसेच काहीसे कंपनी आपल्या Mi LED Smart TV 4A सोबत पण करू शकते. सुरवातीला काही यूनिट्स Rs. 13,999 आणि Rs. 22,999 च्या किंमतीत विकले जातील आणि त्यानंतर यांची किंमत क्रमश: Rs. 14,999 आणि Rs. 22,999 केली जाईल.
32 इंचाच्या वेरियंट बद्दल बोलायचे झाले तर यात अल्ट्रा-ब्राइट LED डिस्प्ले आहे. यात 20W स्टीरियो स्पीकर्स पण आहेत. हा टीवी पॅचवाल ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.
यात 64-बिट क्वाड-कोर प्रोसेसर सह 1GB चा रॅम आणि 8GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे. या LED चा रेजोल्यूशन 1366×768 आहे.
43-इंच वेरियंट मध्ये पण हे सर्व फीचर्स मिळत आहेत. पण याच्या LED चे रेजोल्यूशन 1920×1080 आहे.