Xiaomi काही काळापासून TV सेक्टर मध्ये आपला बिजनेस वाढविण्यावर भर देत आहे आणि त्यामुळेच या चीनी कंपनीने आपला नवीन स्मार्ट TV सादर केला आहे जो पॅचवॉल UI वर आधारित आहे. Xiaomi ने चीन मध्ये Mi TV 4A चा नवीन Youth वर्जन लॉन्च केला आहे, ज्याची स्क्रीन साइज 43 इंच आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनी ने भारतात Mi TV 4A चे 43 इंच आणि 32 इंच मॉडेल लॉन्च केले होते. पण, चीन मध्ये Xiaomi Mi Smart TV चे अनेक मॉडल्स सादर केले गेले आहेत ज्यात 43, 49, 55 आणि 65 इंच मॉडेल्सचा समावेश आहे. त्याचबरोबर कंपनी ने 40 इंच मॉडेल पण सादर केला आहे.
Mi TV 4A Youth Smart TV ची किंमत
Mi TV सीरीज च्या 4A आणि 4C मॉडेल्स ची खासियत बारीक बेजल्स, स्मार्ट फीचर्स आणि 4K मध्ये एक्सेप्शनल पिक्चर क्वालिटी आहे. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे 4A आणि 4C सीरीज च्या youth मॉडेल ची किंमत स्टॅण्डर्ड Mi TV 4 रेंज पेक्षा कमी आहे. कंपनी यूजर्सना कमी किंमतीत जास्त पर्याय दिले आहेत. Mi TV 4A च्या नव्या youth मॉडल बद्दल बोलायचे झाले तर हा असली Mi TV 4A चा छोटा वर्जन म्हणू शकतो जो नवीन मॉडेल च्या तुलनेत जास्त किंमतीत येतो. चीन मध्ये Mi TV 4A Youth ची किंमत CNY 1,699 ठेवण्यात आला आहे जी जवळपास 17,800 रूपये आहे.
स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशन पाहता Mi TV 4A Youth मॉडल मध्ये फुल HD डिस्प्ले आहे ज्याचे रेजोल्यूशन 1920×1080 पिक्सल आहे. स्क्रीन 60Hz चा रिफ्रेश रेट पण ऑफर करते. परफॉरमेंस बद्दल बोलायचे तर Mi TV 4A Youth मॉडल मध्ये क्वॉड-कोर Amlogic Cortex-A53 प्रोसेसर, क्लोक्ड स्पीड 1.5GHz आणि माली-450 GPU आहे तसेच यात 1GB रॅम आणि 8GB इनबिल्ट स्टोरेज आहे.
TV चे डायमेंशन 965.89×607.89×233.22mm (बेस सह) आणि वजन जवळपास 7.58kg आहे. कनेक्टिविटी साठी हा नवीन Mi TV 4A Wi-Fi, दोन HDMI (एक ARC) पोर्ट्स, दोन USB पोर्ट्स, एक ईथरनेट पोर्ट, एक AV कॉम्पोनेन्ट पोर्ट, आणि एक S/PDIF ऑडियो पोर्ट ऑफर करतो. चांगल्या ऑडियो विजुअल एक्सपीरियंस साठी कंपनी ने DTS-HD आणि दोन 6W स्पीकर्स पण दिले आहेत, ज्यात वॉइस कण्ट्रोल फीचर आहे.