झिओमी लाँच करत आहे ४८ इंचाचा ४के पॅनल असलेला एमआय टीव्ही २एस

झिओमी लाँच करत आहे ४८ इंचाचा ४के पॅनल असलेला एमआय टीव्ही २एस
HIGHLIGHTS

अलीकडे सतत बोलले जात असलेल्या प्रोडक्टबद्दल झिओमीने अखेर उघड केले आहे -हा आहे ४के रिझोल्युशन आणि ९.९एमएम जाडी अशी वैशिष्ट्ये असलेला ४८ इंचाचा एमआय टीव्ही २एस

झिओमीने खुप आधीपासून सांगितलेले प्रोडक्टचे अखेर अनावरण केलेय, तो आहे नवीन झिओमी एमआय टीव्ही २एस.. चीनमध्ये एका विशेष कार्यक्रमात ९.९.एमएम बारीक आणि झिओमी एम आय ४ स्मार्टफोनपेक्षा १एमएम अधिक अशा झिओमीच्या नवीन टेलिव्हिजनच अनावरण करण्यात आल. जरी त्याचे अचूक रिझोल्युशन आणि डिस्प्लेच गुणोत्तर अजून उघडकीस येत नसल तरीही ४के रिझोल्युशन डिस्प्लेच्या दर्जामुळे ते आघाडीवर आहे.

 

  

त्याची स्क्रीन ४८ इंचाची आहे. झिओमी दोन प्रकाराचे एमआय टीव्ही २एस चे अनावरण करत आहे ,त्यात एक आहे स्टँडर्ड आवृत्ती ज्याची किंमत आहे CNY २९९९(जवळपास ३०,६७९) आणि दुसरी आहे थिएचर व्हर्जन ज्याची किंमत आहे CNY (जवळपास ४०,०००रुपये) . २२ जुलैपासुन चीनमधील आऊटलेटमध्ये ते उपलब्ध झाले आहेत. चीनच्या बाहेर विकण्याबाबत अजून काहीही निश्चित केले नसल्याचे झिओमीचे म्हणणे आहे. एमआय टीव्ही २एसच्या फायदयासाठी राष्ट्रीय सामग्री प्रदान करणारे युकु, बेसटीव्ही आणि इतर प्रोव्हायडर्सने अतिरिक्त सामग्री पुरवावी यासाठी झिओमीने सौदा केला आहे.

एमस्टार ६ए९२८ चिपसेटने एमआय टीव्ही २एस शक्तिशाली बनविण्यात आले आहे. त्याचबरोबर २जीबी रॅम आणि ८जीबी अंतर्गत साठा आहे. जे एमआययूआय टीव्ही ओएसवर चालते ते अॅनड्रॉईड ल़ॉलीपॉप व्ही५.० ने शक्तिशाली बनले आहे. त्याचबरोबर त्याला एक खास पॉवर प्लग आहे जे जगातल्या सर्वात मोठ्या पॉवर कॉर्ड सप्लायर वोलेक्सने डिझाईन केले आहे. कनेक्टीव्हीटीच्या बाबतीत एमआय टीव्ही २एसला HDMI 2.0 आणि USB ३.०चे पोर्ट बसवण्यात आलेत. त्याचबरोबर वायफाय आणि ब्लूटूथही देण्यात आलय.झिओमीचे सॅमसंग, सोनी ह्या प्रतिस्पर्ध्यांसोबत तुलना केली असता इतरांपेक्षा  एमआय टीव्ही २एस हे चित्राची स्पष्टता, रंगाची अचुकता आणि तीव्रता यामध्ये उत्कृष्ट असल्याचे समोर आले आहे. तसेच एमआय टीव्ही २एस हा आवाजाच्या दर्जामध्येही इतरांपेक्षा चांगला असल्याचे स्पष्ट झालय.                  

तरुण टीव्ही खरेदींदारांना लक्ष करत ह्याचे मागील धातूचे फ्रेम सोनेरी, गुलाबी, निळा, हिरवा आणि चंदेरी अशा पाच रंगात उपलब्ध करण्यात आलय.

Souvik Das

Souvik Das

The one that switches between BMWs and Harbour Line Second Class. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo