घरबसल्या थिएटरची मज्जा! Vu GloLED TV (2025) एडिशन टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

घरबसल्या थिएटरची मज्जा! Vu GloLED TV (2025) एडिशन टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

नवीनतम Vu GloLED TV (2025) सिरीज भारतात लाँच

नव्या TV सीरिजमध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच स्क्रीन 4K टीव्ही लाँच

27 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या Flipkart Big Billion Days Sale दरम्यान नवे TV स्वस्तात खरेदी करण्याची संधी

नुकतेच नवी स्मार्ट TV सिरीज Vu GloLED TV (2025) सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच साईजचे स्क्रीन सादर केले आहे. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हे टीव्ही Google TV OS वर काम करतात. ऑडिओसाठी टीव्हीमधील स्पिकर्स DTS व्हर्च्युअल-X साउंड एन्हांसमेंट, डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतील. या टीव्हीमध्ये व्हॉईस कंट्रोल रिमोट देखील उपलब्ध आहे, जो तुम्ही तुमच्या आवाजाने नियंत्रित करू शकता.

Also Read: नवीनतम Infinix Zero 40 5G भारतीय बाजारात लाँच! विशेष AI फीचर्ससह मिळेल फोटोग्राफीचा उत्तम अनुभव

Vu GloLED TV (2025) ची किंमत आणि उपलब्धता

लेटेस्ट Vu GloLED TV (2025) च्या 43 इंच वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. तर, यात 50 इंच मॉडेलची किंमत 55,000 रुपये इतकी आहे. तर, TV च्या 55 इंच टॉप मॉडेलची किंमत 65,000 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपल्बधतेबद्दल बोलायचे झाल्यास, 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या Flipkart Big Billion Days Sale दरम्यान तुम्हाला हे TV स्वस्तात खरेदी करता येतील.

Vu GloLED TV (2025) एडिशन टीव्ही भारतात लाँच

Vu GloLED TV (2025) चे फीचर्स आणि स्पेक्स

वर सांगितल्याप्रमाणे, या नव्या TV सीरिजमध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच स्क्रीन 4K टीव्ही लाँच करण्यात आले आहेत. या टीव्हीचे रिझोल्यूशन 3840 x 2160 पिक्सेल आहे. हा टीव्ही 1.5GHz VuOn प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB स्टोरेज आणि 2GB रॅम आहे. त्याबरोबरच, या टीव्हीमध्ये Wi-Fi सक्षम रिमोट देखील आहे, ज्यामध्ये व्हॉइस सर्च सपोर्ट आहे. या रिमोटद्वारे तुम्ही तुमच्या आवाजाने देखील टीव्ही नियंत्रित करू शकता. हे टीव्ही Google TV OS वर कार्य करतात.

एवढेच नाही तर, गेमिंगसाठी, स्मार्ट टीव्हीमध्ये VRR, ALLM, क्रॉसहेअर आणि गेम डॅशबोर्डसह गेम मोड समर्थित आहेत. त्याबरोबरच, कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G ड्युअल बँड Wi-Fi, ब्लूटूथ v5.3, Apple, Chromecast, टू-वे ब्लूटूथ सपोर्ट उपलब्ध आहे.

TV मध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की, AI पिक्चर, स्मार्ट सीन आणि अपस्केल, सुपर रिझोल्यूशन, डायनॅमिक बॅकलाईट कंट्रोल, डार्क डिटेल्स, ॲक्टिव्ह कॉन्ट्रास्ट, मोशन एन्हांसमेंट विथ एमईएमसी, लो ब्लू लाईटसह आय प्रोटेक्शन, एनर्जी सेव्हिंग सारखी फीचर्स देखील या टीव्हीमध्ये उपलब्ध आहेत. तसेच क्रिकेट आणि सिनेमा हॉटकीज, पिक्चर, साउंड आणि वाय-फाय हॉटकीज रिमोटमध्ये समर्पित आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo