दिवाळीचे औचित्य साधून इलेक्ट्रॉनिक डिवायसेस निर्माता कंपनी व्हिडियोकॉनने बाजारात देशातील पहिला विंडोज टीव्ही लाँच केला आहे. हा विंडोज आधारित टीव्ही व्हिडियोकॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांनी मिळून बनविला आहे.
व्हिडियोकॉनचे विंडोज १० टीव्ही पुढील महिन्यापासून बाजारात मिळण्यास सुरुवात होईल. कंपनीला खात्री आहे की, पुढील वर्षभरात ५ते६ टक्के विंडोज टीव्ही विकण्यात ते यशस्वी होतील. ह्या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे हा टीव्ही आणि कंम्प्यूटर अशा दोन्ही प्रकारे वापरु शकता. व्हिडियोकॉनच्या ह्या टीव्हीमध्ये विंडोज१० दिला गेला आहे. हा टीव्ही ३२ इंच आणि ४० इंच अशा दोन आकारात लाँच केला आहे. त्यातील ३२ इंचाच्या टीव्हीची किंमत ३९,९९० रुपये तर ४० इंचाचा टीव्ही ५२,९९० रुपये अशा किंमतीत मिळेल.
ह्या पुर्ण HD डिस्प्ले असलेल्या टीव्हीमध्ये 2GB DDR3 रॅम, इनबिल्ट वायफाय, HDMI पोर्ट आणि १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-SD कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकते. त्याशिवाय ह्यात प्री लोडेड Ms Office, विंडोज स्टोरसह ऑल कास्ट अॅपसुद्धा दिला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून आपण ह्या टीव्हीमध्ये अॅनड्रॉईडमधून फोटो आणि व्हिडियो पाठवू शकतो. त्याचबरोबर कंपनीने अशीही माहिती दिली आहे की, बाजारातून मिळणा-या प्रतिसादानंतर कंपनी भविष्यात ह्या टीव्हीच्या ५५ इंच आणि ६५ इंचाचे व्हर्जनसुद्धा लाँच करेल. त्याचबरोबर २४ इंचाचा एक छोटा टीव्हीसुद्धा लाँच करेल.