बजेटमध्ये मोठ्या स्क्रीनसह Thomson QLED TV भारतात लाँच, किंमत 6,799 पासून सुरु

Updated on 02-Apr-2025
HIGHLIGHTS

Thomson QLED TV भारतीय बाजारात लाँच

टीव्हीमध्ये JioHotstar, YouTube, Prime Video, Sony Liv आणि Zee5 यासह अनेक OTT ऍप्स इनबिल्ट आहेत.

या टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केलेल्या गेम्सचा ऍक्सेस देखील देण्यात आला आहे.

Thomson QLED TV भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या टीव्हीमध्ये वापरकर्त्यांना 24 इंच, 32 इंच आणि 40 इंच स्क्रीन साईजचे पर्याय मिळतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये VA पॅनेल उपलब्ध आहेत. यासह, या टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केलेले गेम्स देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, या टीव्हीमध्ये JioHotstar, YouTube, Prime Video, Sony Liv आणि Zee5 यासह अनेक OTT ऍप्स इनबिल्ट आहेत. जाणून घेऊयात टीव्हीची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सशी संबंधित सर्व तपशील-

Also Read: Realme Narzo 80 सिरीज स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट Confirm! जाणून घ्या अपेक्षित किंमत, फीचर्स उघड

Thomson QLED TV ची किंमत

Thomson QLED TV कंपनीने 6,799 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केले आहेत. या किमतीत तुम्हाला 24-इंच स्क्रीन पर्याय मिळणार आहे. त्याबरोबरच, टीव्हीच्या 32 इंच लांबीच्या व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर, टॉप 40 इंच लांबीचे मॉडेल 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे टीव्ही प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असतील.

Thomson QLED TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, Thomson QLED TV सध्या 24 इंच, 32 इंच आणि 40 इंच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या टीव्हींमध्ये VA पॅनल्सचा सपोर्ट आहे. लक्षात घ्या की, हा टीव्ही Linux Coolita 3.0 ऑपरेटिंग सिस्टमसह कार्य करतो. या टीव्हीला ऑडिओसाठी 24W चा साउंड आउटपुट मिळतो. तसेच, 32 इंच आणि 40 इंच मॉडेल्सना 26W साउंड आउटपुट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये HMDI आणि USB पोर्ट देखील उपलब्ध आहेत.

या टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केलेल्या गेम्सचा ऍक्सेस देखील देण्यात आला आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, या बजेट टीव्हीमध्ये OTT ऍक्सेस देखील मिळतात. ज्यासह JioHotstar, YouTube, Prime Video, Sony Liv आणि Zee5 इ. समावेश करण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये लाईव्ह चॅनेल, नेटवर्क फ्री स्क्रीन मिररिंग, व्हॉइस सर्च आणि Wi-Fi सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :