65 इंच लांबीचा स्वस्त Thomson TV लाँच, किंमत केवळ 43 हजार रुपये

65 इंच लांबीचा स्वस्त Thomson TV लाँच, किंमत केवळ 43 हजार रुपये
HIGHLIGHTS

Thomson 65 इंच TV स्वस्त किमतीत लाँच

या TV ची किंमत 43,999 रुपये आहे.

Flipkart Summer Saving Days Sale 13 एप्रिलपासून सुरु होणार

Thomson ने 65 इंच लांबीचा Google TV लाँच केला आहे, हा TV स्वस्त किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा TV OATH PRO MAX सिरीज अंतर्गत सादर केला गेला आहे. या TV मध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये, Google TV, Dolby Digital आणि Dolby ATMOSचा समावेश आहे.

Thomson 65 इंच OATH PRO MAX TV 

किमंत : 

 या TV ची किंमत 43,999 रुपये आहे.  Flipkart Summer Saving Days Sale 13 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ही सेल 17 एप्रिलपर्यंत चालणार आहे. हा TV फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

या TV मध्ये 2GB रॅम आणि 16 GB स्टोरेज दिली गेली आहे. यामध्ये बेजल लेस आणि एअर स्लिम डिझाईन देण्यात आले आहे. त्याबरोबरच, हा TV Dolby HDR 10+ ला सपोर्ट करतो. 40W Dolby ऑडिओ स्टीरियो बॉक्स स्पिकर्ससह ड्युअल बँड उपलब्ध आहे. यामध्ये, वायफाय आणि गुगल TV सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. 

त्याबरोबरच, या TVमध्ये Netflix, Prime Video, Hotstar, Zee5, Apple TV, VOOT, Sony LIV, Google play store इ. ऍप्सचे सपोर्ट देण्यात आले आहे. 

याव्यतिरिक्त, इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास मल्टिपल ऍडल्ट आणि चाईल्ड युजर प्रोफाइल, स्मार्ट टीव्ही ऍप्स कलेक्शन, पर्सनलाइझ्ड कंटेंट, स्मार्ट होम डिवाइससाठी मॅन्युअल आणि व्हॉइस कन्ट्रोल, प्रत्येक युजर्ससाठी पर्सनलाइझ्ड होम स्क्रीन, लाईट आणि कॅमेरासाठी स्मार्ट होम कंन्ट्रोल्स इ. खास सुविधा मिळतील.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo