TCL कंपनीचे प्रोडक्ट्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले नवीन स्मार्ट गुगल टीव्ही लाँच केले आहेत. TCL T6G स्मार्ट QLED Google TV असे या टीव्हीचे नाव आहे, हा टीव्ही तीन साईजमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच स्क्रीनचा समावेश आहे.
TCL T6G 43-इंच टीव्हीची किंमत 38,990 रुपये आहे. त, 50-इंच लांबीच्या टीव्हीची किमंत 46,990 रुपये आणि 55-इंच लांबीचा टीव्ही 54,990 रुपयांना खरेदी करता येईल. हा टीव्ही Amazon India आणि Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
TCL T6G स्मार्ट QLED Google TV टीव्ही अल्ट्रा-प्रिमियम फिनिशमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 3840 x 2160 पिक्सेल आहे आणि त्याला 300 nits ब्राइटनेस आहे. या टीव्हीमध्ये 4K रिझोल्यूशन आणि डॉल्बी व्हिजनचे सपोर्ट आहे. यासोबतच, TCL टीव्ही 64-बिट क्वाड कोर प्रोसेसर आणि Mali-G31 x 2 800MHz GPU द्वारे समर्थित आहे. टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे.
यामध्ये, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबसारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म व्हॉईस कमांडसह उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे गेमिंग प्रेमींसाठी टीव्हीमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.