Sony ने आपली नवीन टीव्ही सिरीज Sony XR OLED A80K TV भारतात लाँच केला आहे. या TV सिरीजअंतर्गत, सोनीने 55 इंच, 65 इंच आणि 77 इंच व्हेरिएंट सादर केले आहेत. हा टीव्ही अल्ट्रा HD OLED पॅनेलसह येतो, यामध्ये कॉग्निटिव्ह प्रोसेसर XR मिळतो. Sony XR OLED A80K टीव्ही HDR आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. चला तर मग जाणून घेऊया टीव्हीचे इतर फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…
हे सुद्धा वाचा : BSNL Recharge Plan : कमी किमतीत मिळेल 30 दिवसांची वैधता आणि अमर्यादित कॉलिंग, जाणून घ्या काय खास
या सोनी TV मध्ये अल्ट्रा HD OLED पॅनेलसह 3840×2160 पिक्सेलचे रिझोल्यूशन आहे. कॉग्निटिव्ह प्रोसेसर XR प्रोसेसर आणि डॉल्बी ऍटमॉससह DTS डिजिटल सराउंड साउंड फॉरमॅट देखील टीव्हीमध्ये देण्यात आला आहे. Sony XR OLED A80K टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, HDR आणि HLG फॉरमॅटसह हाय डायनॅमिक रेंज कंटेंट बघता येईल. टीव्हीच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात IMAX आणि Netflix साठी वेगळा एडोप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड दिला गेला आहे.
Sony XR OLED A80K TV Android सॉफ्टवेअरवर काम करतो. यामध्ये अनेक ऍप्स आधीपासूनच उपलब्ध आहेत, इतर ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरूनही डाउनलोड करता येतात. हा टीव्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब, ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिझनी प्लस हॉटस्टार यांसारख्या ऍपला सपोर्ट करतो. तुम्हाला टीव्हीमध्ये बिल्टइन Google Chromecast देखील मिळेल. टीव्हीच्या इतर कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचे तर, त्यात Apple AirPlay 2 आणि HomeKit डिव्हाइसेस देखील कनेक्ट केले जाऊ शकतात. टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट सपोर्टही उपलब्ध आहे.
सोनीची ही टीव्ही सिरीज तीन वेरिंएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच्या 65-इंच लांबीच्या डिस्प्ले व्हेरिएंटची किंमत 2,79,990 रुपये आहे, तर 77-इंचाच्या डिस्प्ले व्हेरिएंटची किंमत 6,99,900 रुपये आहे. हे दोन्ही व्हेरिएंट 22 जुलैपासून सोनी सेंटर स्टोअर, इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर आणि ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी केले जाऊ शकतात. मात्र, कंपनीने अद्याप Sony XR OLED A80K टीव्हीच्या 55-इंच वेरिएंटची किंमत जाहीर केलेली नाही.