Sony ने भारतात BRAVIA X82L टेलिव्हिजन सिरीज लाँच केली आहे. या लाइनअपमध्ये 55-इंच, 65-इंच आणि 75-इंच लांबीचे टीव्ही समाविष्ट आहेत. या सर्व स्मार्ट टीव्हीमध्ये कंपनीचा X1 4K HDR पिक्चर प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम आणि डॉल्बी व्हिजन यांसारख्या ऍडवान्सड सुविधा देखील या स्मार्ट टीव्हीमध्ये मिळणार आहेत.
या सिरीजच्या 55-इंच मॉडेलची किंमत 91,990 रुपये आहे. तर, 65-इंच लांबीचा टीव्ही 1,24,990 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, या सिरीजमधील टॉप-एंड मॉडेल म्हणजेच 75-इंच टीव्हीची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. आगामी काळात ही किंमत जाहीर केली जाईल. हे टीव्ही अधिकृत स्टोअर, वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी केले जाऊ शकतात.
टीव्ही ब्रँड Sony ने एप्रिलमध्ये Sony Bravia X70L 4K LED टीव्ही लाँच केला. Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Sony LIV आणि YouTube चा कंटेंट या टीव्हीवर पाहता येईल. Sony Bravia X70L 4K LED टीव्ही गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट आहे, जो रिमोट दिलेल्या बटणाद्वारे सक्रिय केला जाऊ शकतो. याशिवाय स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ आणि HDMI पोर्ट देण्यात आले आहेत.