Sony कंपनीच्या वस्तू भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण यामध्ये ग्राहकांना उत्तम दर्जाचे प्रोडक्ट्स मिळतात. जर तुमच्या जुन्या TVमध्ये बिघाड आला आहे किंवा तुम्हाला नवा स्मार्ट TV खरेदी करायचा आहे. तर आम्ही तुमच्यासाठी एका नव्या नुकत्याच लाँच झालेल्या TV बद्दल माहीती घेऊन आलो आहोत. Sony Bravia X80L Series नुकतीच लाँच झालेली आहे.
Sony Bravia X80L Series 43 इंच, 50 इंच आणि 85 इंच लांबीच्या स्क्रीन साईजमध्ये लाँच करण्यात आली आहे. बघुयात किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
Sony Bravia X80L Series च्या 43 इंच लांबीच्या TV मॉडेलची किंमत 99,900 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच, 50 इंच लांबीच्या TV मॉडेलची किंमत 1,14,900 रुपये इतकी आहे. मात्र, TV च्या 85 इंच साईजची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केली नाही. स्मार्ट TV ची विक्री आज 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
सिरीजमधील सर्व टीव्ही मॉडेल्स 3,840 x 2,160 पिक्सेल, डॉल्बी व्हिजन, HDR10 च्या स्क्रीन रिझोल्यूशन सपोर्टसह येतात. लेटेस्ट मॉडेल्समध्ये अँबीयंट लाइट सेन्सर देण्यात आला आहे, जो रूम लाईटनुसार TV स्क्रीन ब्राइटनेसला ऑप्टिमाइझ करण्याचे काम करतो. टीव्हीमध्ये 20W X संतुलित स्पीकर देण्यात आले आहेत, जे डीप बास आणि क्लियर ऑडिओ देतात. त्यासोबतच, यात डॉल्बी ATMOS साउंड सपोर्ट मिळेल.
Sony च्या या मॉडेल्समध्ये गेमिंगसाठी PS5 सपोर्टदेखील मिळणार आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ वर्जन 4.2 HDI, ड्युअल बंद वायफाय, HDMI पोर्ट्स ऑडिओ जॅक इ. फीचर्स मिळतील.