भारतीय ग्राहकांमध्ये Sony कंपनीची उपकरणे लोकप्रिय आहेत. नुकतेच, Sony ने भारतीय बाजारात Sony Bravia X70L स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. नवा TV X1 4K प्रोसेसर, लाइव्ह कलर टेक्नॉलॉजी, एक्स-रिऍलिटी प्रो आणि बऱ्याच फीचर्ससह येतो. हा मिड रेंज टीव्ही प्रीमियम स्पेसिफिकेशन्स ऑफर करतो.
Sony Bravia X70L च्या 43 इंच वेरिएंटची किंमत 59,900 रुपये आहे. तर, Sony Bravia X70L च्या 50 इंच वेरिएंटची किंमत 74,900 रुपये आहे. Sony Bravia X70L सिरीज सोनी सेंटर्स, आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Sony Bravia X70L X1 4K पिक्चर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. या टीव्हीमध्ये स्लिम बेझल्स आणि स्लिमलाइन स्टँड देण्यात आला आहे. Sony Bravia X70L ऑपरेटिंग सिस्टमसाठी Google TV OS वर चालतो, जो Apple Home Kit आणि AirPlayच्या स्पोर्टसह येतो. हा TV 20W साउंड आउटपुट ऑफर करतो आणि डॉल्बी ऑडिओसह येतो.
टीव्ही रिमोटमध्ये व्हॉइस अनेबल फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच, 6 हॉटकी देखील देण्यात आल्या आहेत, जे Amazon Prime Video, Netflix, Disney Plus Hotstar, Sony Liv आणि इतरांना सपोर्ट करतात. याशिवाय हा Sony TV X-Protection Pro टेक्नॉलॉजीसह येतो. जो डस्ट आणि ह्युमिडिटी प्रोटेक्शनसह येतो.