Sony च्या महागड्या TV वर मिळतोय बंपर डिस्काउंट, तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा

Updated on 03-Apr-2023
HIGHLIGHTS

Sony Bravia 4K TV वर हजारोंची बचत करा

फ्लिपकार्टवर TV स्वस्तात खरेदी करण्याची संधी

TVमध्ये Netflix, prime video, disney plus hotstar आणि youtube चे सबस्क्रिप्शन

Sony हा तंत्रज्ञान जगतातील एक लोकप्रिय आणि महागडा ब्रँड म्हणून ओळखला जातो. या ब्रँडची उपकरणे खरेदी करणे म्हणजे खिशाला थोडा फटका बसतोच. तरीही तुम्हाला जर SONY चा TV खरेदी करायचा असेल तर, आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. Sony Bravia 4K TV आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा TV तुम्हाला निम्म्या किमतीत खरेदी करता येणार आहे. 

किंमत आणि ऑफर्स

 Sony Bravia 4K TV फ्लिपकार्टवर 77,890 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या TVची MRP 1,39,900 रुपये इतकी आहे. मात्र, हा TV तुम्हाला सध्या 44% सूट देऊन खरेदी करता येणार आहे. त्याबरोबरच, TV खरेदीवर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. 

याव्यतिरिक्त, डेबिट आणि क्रेडिट कार्ड डिस्काउंटसह व्यवहारांवर 3 हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या संपूर्ण सवलतींचा लाभ मिळाल्यास हा TV एकूण 63,000 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. हा टीव्ही 4,328 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी केला जाऊ शकतो. 

Sony Bravia 4K TV चे स्पेसीफिकेशन्स

  Sony Bravia 4K TV मध्ये अल्ट्रा HD 4K रिझोल्युशन देण्यात आले आहे. आत तुम्हाला 60Hz चे रिफ्रेश रेट मिळेल. TV चे साउंड आउटपुट 20W आहे. हा TV LED डिस्प्ले स्पोर्टसह येतो. TV मध्ये लाईव्ह कलर, HDR10, HLG आणि Motionflow XR 200 सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वायरलाईन लॅन ऍडॉप्टर, ब्लूटूथ, बिल्ड इन Wi-Fi सपोर्ट देण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, TVमध्ये Netflix, prime video, disney plus hotstar आणि youtube चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. TV गुगल TV अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :