भारीच की ! Samsungने लाँच केला Smart Upgrade Program , फक्त 70% पैसे देऊन घरी आणा नवीन टीव्ही
Samsung कडून Smart Upgrade Program लाँच
हा कार्यक्रम फ्लिपकार्टसोबत पार्टनरशिप करून जारी केला जातोय.
याद्वारे, ग्राहक सॅमसंगचा प्रीमियम टीव्ही फक्त 70% किंमतीत खरेदी करू शकतात.
Samsung ने Smart Upgrade Program ची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम फ्लिपकार्टसोबत पार्टनरशिप करून जारी केला जातं आहे. या प्रोग्रामद्वारे, ग्राहक सॅमसंगचा प्रीमियम टीव्ही फक्त 70% किंमतीत खरेदी करू शकतात.
उर्वरित पैसे म्हणजे 30% तुम्हाला 12 महिन्यांनंतर भरावे लागतील. याद्वारे, तुम्ही Samsung Neo QLED, The Frame आणि Crystal UHD सारखे टीव्ही खरेदी करू शकता. कंपनीने म्हटले आहे की, या प्रोग्रामद्वारे यूजर्सना सहज टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळेल.
हे सुद्धा वाचा : जबरदस्त ! एक मस्त साउंडबार विकत घेण्याआधी, बघा Amazonच्या 'या' अप्रतिम डिल्स
या कार्यक्रमात, ग्राहक अपफ्रंट 23,093 रुपये भरून Samsung Crystal 4K UHD टीव्ही घरी आणू शकतात. त्याला 12 महिन्यांनंतर उर्वरित 9,897 रुपये भरावे लागतील. Samsung Frame 2021 Series QLED Ultra HD (4K) स्मार्ट टीव्ही 38,493 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्यानंतर 16,497 रुपयांचे उर्वरित पेमेंट 12 महिन्यांनंतर द्यावे लागेल.
कंपनीने म्हटले की, स्मार्ट अपग्रेड हा टीव्ही खरेदी करण्याचा पहिलाच कार्यक्रम आहे, जो फ्लिपकार्टच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. याद्वारे, ग्राहक कमी खर्चात त्यांचे टीव्ही अपग्रेड करू शकतात.
Neo QLED मध्ये अत्याधुनिक क्वांटम मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी प्रो देण्यात आला आहे. हा पावरफुल न्यूरल क्वांटम प्रोसेसर 8K आणि रियल डेप्थ एन्हान्सर देण्यात आला आहे. Samsung च्या 2022 Neo QLED TV मध्ये स्मार्ट आणि इंटेलिजेंट फीचर्स आणि यूजर इंटरफेस देण्यात आला आहे.
FRAME TVमध्ये QLED तंत्रज्ञान आणि एन्हान्सड कॉन्ट्रास्ट देण्यात आला आहे. यात क्वांटम डॉट टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे. याशिवाय यात क्वांटम प्रोसेसर 4K, 4K AI अप स्केलिंग कॅपॅबिलिटी आणि स्पेसफिट साउंड देण्यात आला आहे. क्रिस्टल 4K UHD टीव्ही रेंज HDR एक्सपेरियन्ससह येते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile