सॅमसंगने त्याच्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलिओमध्ये आणखी एक नवीन स्मार्ट टीव्ही Samsung 32-इंच लांबीचा HD स्मार्ट टीव्ही जोडला आहे. हा टीव्ही फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान सादर करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी किमतीचा स्मार्ट टीव्ही आहे. डॉल्बी डिजिटल प्लस सपोर्ट आणि 3D साउंड सारखी फीचर्स टीव्हीमध्ये उपलब्ध आहेत. Samsung 32-इंच लांबीचा HD स्मार्ट टीव्ही 20W स्पीकर्ससह येतो.
हे सुद्धा वाचा : iPhone 13 सीरीजचा 'हा' फोन Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये मिळतोय इतका स्वस्त, वाचा सविस्तर
या सॅमसंग टीव्हीमध्ये 32-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 50Hz रिफ्रेश रेट आहे. टीव्हीसोबत हाय डायनॅमिक रेंज आणि पर्कलर टेक्नॉलॉजी सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, टीव्हीला डार्क आणि लाईट अशा दोन्ही वातावरणात उत्कृष्ट पिक्चर कॉलिटी मिळते. स्मार्ट टीव्ही 20W स्पीकरसह येतो, जो डॉल्बी डिजिटल प्लस सपोर्ट आणि 3D साउंड सारख्या फीचर्सना सपोर्ट देतो.
सॉफ्टवेअर फीचर्समध्ये, सॅमसंग 32 इंच HD स्मार्ट टीव्ही PC मोड, गेम मोड, स्क्रीन मिररिंग आणि मनोरंजनासाठी युनिव्हर्सल गाइडला सपोर्ट करतो. TV सोबत, Samsung TV Plus वर 55 ग्लोबल आणि लोकल लाइव्ह चॅनेल देखील उपलब्ध आहेत. यासोबतच टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, यूट्यूब, डिजनी प्लस हॉटस्टार आणि AMAZON प्राइम व्हिडिओ ऍपसाठी सपोर्टही देण्यात आला आहे.
Samsungचा 32 इंच लांबीचा HD स्मार्ट टीव्ही 12,499 रुपये किमतीत लाँच करण्यात आला आहे. स्मार्ट टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकतात.