Samsung कंपनीने बजेट रेंजमध्ये नवे TV सादर केले गेले आहेत. सॅमसंगने नवीन Samsung Crystal 4K iSmart UHD TVs लाइनअप अंतर्गत 43 इंच ते 65 इंच लांबी पर्यंतचे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. हा टीव्ही अनेक फ्लॅगशिप लेव्हल फीचर्सने सुसज्ज आहे. चाल तर वेळ न घालवता या TV ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स बघुयात-
Samsung Crystal 4K iSmart UHD टीव्ही मध्ये स्क्रीन साईज 43 इंच ते 65 इंच आहे. 43 इंच मॉडेलची किंमत 33,990 रुपये आहे. तर 65 इंच मॉडेलची किंमत 71,999 रुपये आहे. हे नवे TV तुम्ही Amazon, Flipkart आणि Samsung Store वरून खरेदी करू शकता. कंपनी या टीव्हीवर 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI देखील देईल.
या TV मॉडेल्समध्ये बेझल-लेस डिझाइन देण्यात आले आहे. उत्कृष्ट ऑडिओसाठी यात 20W स्पीकर्स आहेत. यात IoT सेन्सर आहे, आपोआप ब्राइटनेस ऍडजस्ट करतो, जेणेकरून ब्राईटनेसचा दर्शकांच्या डोळ्यांवर परिणाम होणार नाही. सॅमसंग कंपनीने या टीव्हीसोबत Calm Onboarding टेक्नॉलॉजी दिली आहे. ही टेक्नॉलॉजी थर्ड पार्टी डिव्हाइसेस आपोआप आयडेंटिफाय करून पेयर करेल.
टीव्हीसोबत स्लिम फिट कॅमेरा दिला जाईल, ज्याची किंमत 8,900 रुपये आहे. हा एक वेबकॅम आहे. स्मार्ट हब टीव्हीवर तुमच्या आवडीचा कंटेंट प्रदर्शित करते. अशा स्थितीत तुम्हाला कंटेंट शोधण्यात जास्त वेळ वाया न घालवता कंटेंटचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल. त्यानुसार कंपनीने पर्सनलाइज्ड स्मार्ट हब टीव्ही दिला आहे.