SAMSUNG ने लाँच केला तब्बल 98 इंच लांबीचा TV, किंमत ऐकून बसेल धक्का
Samsung ने Neo QLED 8K आणि 4K स्मार्ट टीव्ही मॉडेल लाँच केले.
दोन्ही TVची किंमत तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे का ?
इन्फिनिटी स्क्रीनसह उत्तम व्युइंग एक्सपेरियन्स उपलब्ध
SAMSUNG ने आपले नवीन आणि जबरदस्त TV लाँच केले आहेत. हे TV तुम्हाला घरच्या घरीच थिएटरची मजा देणार आहेत. Samsung ने Neo QLED 8K आणि 4K स्मार्ट टीव्ही मॉडेल लाँच केले आहेत. हे TV मॉडेल्स 50 इंच ते 98 इंच स्क्रीन साईजचे मॉडेल्स आहेत. बघुयात किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
Samsung Neo QLED 8K ची किंमत
सॅमसंगच्या या नव्या टीव्हीची किंमत 3 लाख 14 हजार 990 रुपयांपासून सुरू होते. या टीव्ही सिरीजमध्ये 65 इंच, 75 इंच, 85 इंच आणि 98 इंच स्क्रीन साईजचे चार मॉडेल्स आहेत.
Samsung Neo QLED 4K ची किंमत
या TV सिरीजची किंमत 1 लाख 41 हजार 990 रुपये आहे. सॅमसंगच्या रिटेल स्टोअर व्यतिरिक्त तुम्ही हे टीव्ही मॉडेल्स ई-कॉमर्स स्टोअरमधून खरेदी करू शकता.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
8K आणि 4K टीव्हीमध्ये वापरल्या जाणार्या क्वांटम मेट्रिक टेक्नॉलॉजी आणि न्यूरल क्वांटम प्रोसेसरबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, टेक्नॉलॉजी आणि प्रोसेसर दोन्ही युजर्सना उत्तम कलर्स आणि पिक्चर कॉलिटी देण्याचे कार्य करतील.
त्याबरोबरच, यामध्ये तुम्हाला इन्फिनिटी स्क्रीनसह उत्तम व्युइंग एक्सपेरियन्स मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट साउंड एक्सपेरियन्ससाठी, Q Symphony 3.0, Wireless Dolby Atmos, Adaptive Sound Pro आणि Object Tracking Sound Pro हे सर्व दोन्ही टीव्ही मॉडेल्समध्ये संतुलित आवाज देण्याचे कार्य करणार आहेत.
याव्यतिरिक्त, गेमिंग लव्हर्सना व्हर्च्युअल एम पॉइंट, गेम बार, सुपर अल्ट्रावाइड गेम व्ह्यू, मोशन एक्सेलरेटर टर्बो प्रो आणि गेम मोशन प्लस सारखी जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile