Redmi Smart Fire TV 4K: कंपनीने भारतात लाँच केले दोन नवीन Smart TV, जाणून घ्या किंमत आणि विशेषता

Updated on 16-Sep-2024
HIGHLIGHTS

नवे Redmi Smart Fire TV 43 आणि 55 2024 एडिशन भारतात लाँच करण्यात आले आहेत.

हे TV Fire TV OS वर कार्य करतात, ज्यामध्ये तुम्हाला 12,000 पेक्षा जास्त OTT ॲप्सचा ऍक्सेस मिळतो.

नव्या TV ची विक्री शॉपिंग साईट Flipkart आणि mi.com वर 18 सप्टेंबर रोजी सुरु होईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi चे स्मार्ट TV देखील भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. नवे Redmi Smart Fire TV 43 आणि 55 2024 एडिशन भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे TV Fire TV OS वर कार्य करतात, ज्यामध्ये तुम्हाला 12,000 पेक्षा जास्त OTT ॲप्सचा ऍक्सेस मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या TV मध्ये 43 इंच आणि 55 इंच स्क्रीन साईज मिळेल. हे टीव्ही 4K रिझोल्युशनसह येतात. जाणून घेऊयात नव्या स्मार्ट टीव्हीची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सशी संबंधित तपशील-

Also Read: Flipkart Big Billion Days Sale 2024: ‘या’ दिवशीपासून होणार सुरु, भारी बँक ऑफर्ससह मिळतील मोठ्या सवलती

Redmi Smart Fire TV 4K ची किंमत

Redmi कंपनीने Redmi Smart Fire TV 4K चा 43 इंच लांबीचा TV 24,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याबरोबरच, 55 इंच मॉडेलची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे TV शॉपिंग साईट Flipkart आणि mi.com वर 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.

Redmi Smart Fire TV 4K चे तपशील

Redmi Smart Fire TV 4K ची स्क्रीन 43 इंच आणि 55 इंच लांबी या फोन स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही टीव्हीमध्ये तुम्हाला 178 डिग्री व्ह्यूइंग अँगल मिळेल. विशेषतः या TV मध्ये Vivid Picture Engine, Auto Low Latency Mode, MEMC Reality Flow सारखे फीचर्सही यामध्ये आहेत. हे टीव्ही फायर टीव्ही OS 7 वर कार्य करतात. OS समर्थनासह तुम्हाला TV मधील 12,000 पेक्षा जास्त OTT ॲप्सचा ऍक्सेस मिळतो. ज्यामध्ये Prime Video, Netflix, Disney + Hotstar यांचा समावेश आहे.

त्याबरोबरच, हा टीव्ही क्वाड-कोर कॉर्टेक्स A55 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज पर्याय मिळतो. ऑडिओसाठी, 43 इंच लांबीच्या मॉडेलमध्ये 24W स्पीकर प्रदान केले आहेत. तर, 55 इंच मॉडेल 30W साउंड आउटपुटसह येतो. या स्पीकर्सला डॉल्बी ऑडिओ, DTS-HD, DTS व्हर्च्युअल एक्ससाठी सपोर्ट आहे.

याव्यतिरिक्त, या टीव्हीसोबत अलेक्सा सपोर्टसह व्हॉइस रिमोट देखील उपलब्ध आहे. TV च्या रिमोटमध्ये टीव्ही गाइड, प्ले बॅक कंट्रोल्स, चॅनल अप/डाउन, म्यूट आणि प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन म्युझिकसाठी शॉर्टकटसाठी समर्पित की आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :