लेटेस्ट Redmi Smart Fire TV 32 2024 एडिशन भारतात लाँच, Affordable किमतीत दाखल। Tech News

Updated on 07-Jun-2024
HIGHLIGHTS

नवीनतम Redmi Smart Fire TV 32 2024 एडिशन भारतात लाँच

Redmi Smart Fire TV 32 2024 एडिशन फक्त 11,999 रुपयांच्या किमतीत लाँच

मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी या टीव्हीमध्ये पॅरेंटल कंट्रोल फीचर देखील देण्यात आले आहे.

लेटेस्ट Redmi Smart Fire TV 32 2024 एडिशन भारतात लाँच करण्यात आली आहे. अर्थातच, Redmi च्या विद्यमान रेडमी स्मार्ट फायर टीव्हीची ही नवीनतम आवृत्ती आहे. या टीव्हीची स्क्रीन 32 इंच लांबीची आहे. या स्मार्ट TV ची किंमत कंपनीने 12,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. या टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. चला तर मग जाणून घेऊयात Redmi Smart Fire TV 32 2024 एडिशनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Nothing Phone (3) जागतिक बाजारात होणार दाखल! CEO कार्ल पेई यांनी दिले संकेत, वाचा सविस्तर

Redmi Smart Fire TV 32 2024 एडिशनची किंमत

कंपनीने Redmi Smart Fire TV 32 2024 एडिशन फक्त 11,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे टीव्हीवर 1000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. या ऑफरसह तुम्ही हा टीव्ही फक्त 10,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीची विक्री 11 जूनपासून सुरू होणार आहे. हा स्मार्ट TV तुम्ही Mi.com, Amazon India आणि Flipkart वरून खरेदी करू शकता.

Redmi Smart Fire TV 32 2024

Redmi Smart Fire TV 32 2024 Edition

Xiaomi च्या Redmi Smart Fire TV 32 2024 Edition बद्दल बोलायचे झाल्यास, या TV मध्ये 32 इंच लांबीची स्क्रीन आहे. या स्क्रीनचा रीफ्रेश रेट 60Hz इतका आहे. या टीव्हीमध्ये प्रीमियम मेटल बेझल्स देखील देण्यात आले आहेत. तसेच, हा टीव्ही क्वाड-कोर कॉर्टेक्स A35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या टीव्हीमध्ये 8GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. ऑडिओसाठी टीव्हीमध्ये दोन 20W स्पीकर आहेत, ज्यामध्ये डॉल्बी ऑडिओ, DTS व्हर्च्युअल एक्स आणि DTS HD सपोर्ट उपलब्ध आहे.

स्मार्ट TV च्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या TV मध्ये 12,000 पेक्षा जास्त ॲप्स सेव्ह करू शकता. याशिवाय, यात LIVE टीव्ही चॅनेलही यामध्ये उपलब्ध आहेत. या टीव्हीसोबत अलेक्सा सपोर्टसह व्हॉईस कंट्रोल रिमोटही उपलब्ध आहे. या रिमोट कंट्रोलवर अलेक्सासाठी एक समर्पित बटण देखील देण्यात आले आहे.

एवढेच नाही तर, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी या टीव्हीमध्ये पॅरेंटल कंट्रोल फीचर देखील देण्यात आले आहे. TV मध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये ब्लूटूथ 5.0, Wi-Fi इ. फीचर्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :