Redmi India ने शेवटी Redmi Fire TV भारतात लॉन्च केला आहे. Amazon च्या Fire OS सपोर्टवर डिझाइन केलेला हा कंपनीचा पहिला स्मार्ट टीव्ही आहे. Amazon इंडियाच्या वेबसाइटवर त्याच्या विक्रीसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे.
हे सुध्दा वाचा : WhatsApp वर येणार अनोखे फिचर ! मोबाईल नंबर सिस्टम येणार का संपुष्टात ?
Redmi Fire TV 13,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. 21 मार्चपासून Amazon आणि Mi.com वर खरेदी करता येईल. हा टीव्ही खरेदी करण्यावर ग्राहकांना काही बँक डिस्काउंट देखील मिळू शकतात, त्यानंतर त्याची किंमत 11,999 रुपये होईल. रेडमी फायर टीव्ही इको-फ्रेंडली पॅकेजिंगमध्ये वितरित केला जाईल.
नवीन रेडमी स्मार्ट टीव्हीमध्ये मेटॅलिक-बेझल-लेस डिझाइन आहे. याशिवाय हे बॉटम-फायरिंग स्पीकर आणि एअरप्ले सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की, या टीव्हीवर इमर्सिव्ह ऑडिओ आणि उत्तम व्हिज्युअल अनुभव मिळेल. हे 720p रिझोल्यूशनसह HD-रेडी स्मार्ट टेलिव्हिजन आहे, ज्याद्वारे वापरकर्ते केबल टीव्हीवर HD चॅनेल पाहू शकतात. यात सेट-टॉप बॉक्स आणि गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी अनेक HDMI पोर्ट आहेत.
Redmi Fire TV मध्ये Fire OS 7 स्किन देण्यात आली आहे, जो स्मार्ट हब कंट्रोलसह येतो. गुगल असिस्टंटऐवजी अलेक्सा शॉर्टकट त्याच्या रिमोट कंट्रोलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय रिमोटमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि Amazon म्युझिक सारख्या OTT प्लॅटफॉर्मसाठी वेगळे बटण आहे. याशिवाय वापरकर्ते रेडमी स्मार्ट फायर टीव्हीवर अँड्रॉइड ऍप्स आणि गेम्स साइडलोड करू शकतात. टीव्हीच्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल-बँड Wi Fi चा समावेश आहे.