तुम्ही किंवा तुमच्या घरी टीव्ही समोर जास्तीत जास्त वेळ घालवणारी मंडळी असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मोठ्या स्क्रीन वर जर आवडता पिक्चर किंवा मालिका बघण्याची मजा काही औरच असते. पण, मोठ्या स्क्रीनचे TV खरेदी करणे, म्हणजे खिशावर चांगलाच ताण येतो. पण तुम्ही काळजी करू नका, जर तुम्हाला मोठा टीव्ही स्वस्तात हवा असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा.
Redmi चा 43 इंच अँड्रॉइड टीव्ही तब्बल 40% फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे.
Redmi 4K ultra HD Android smart TV किंमत
या टीव्हीची खरी किंमत 40,999 रुपये इतकी आहे. पण 40% फ्लॅट डिस्काउंटसह हा टीव्ही 25,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय, HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पे केल्यास 10% सूट दिली जात आहे. HSBC क्रेडिट कार्डने पे केल्यास तुम्हाला 7.5% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच, येस बँक कॉर्डने व्यवहार केल्यास देखील 7.5% ऑफ मिळणार आहे.
याव्यिरिक्त तुम्ही हा टीव्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. तुम्हाला यासाठी दर महिन्याला 1242 रूपये द्यावे लागतील. यासोबत एक्सचेंज ऑफर जोडल्यास किंमत आणखी कमी होईल. एक्सचेंज ऑफरमध्ये 2,500 रुपयांची ऑफ दिली जात आहे. खरेदी करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या साइटला किंवा इ-काॅमर्स प्लॅटफाॅर्म्सना भेट द्या.
फीचर्स आणि स्पेक्स
या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD डिस्प्ले दिला गेला आहे, ज्यासोबत 60Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामध्ये Android TV 10 आहे. तसेच, 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज दिली गेली आहे. हा टीव्ही prime video, Netflix, Disney+Hotstar, YouTube, Apple TV इ. ना सपोर्ट करतो. यामध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट देण्यात आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.