डॉल्बी ऍटमॉससह Philips चा नवा स्मार्ट TV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम फीचर्स

डॉल्बी ऍटमॉससह Philips चा नवा स्मार्ट TV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम फीचर्स
HIGHLIGHTS

Philips 7900 Ambilight Ultra-HD LED Android TV भारतात लाँच

नवीन स्मार्ट TV तीन व्हेरिएंटमध्ये लाँच

स्मार्ट टीव्हीमध्ये थ्री-साइड अँबिलाइट LED लाईट्स उपलब्ध

Philips ने आपली Android Smart TV सिरीज Philips 7900 Ambilight Ultra-HD LED Android TV भारतात लाँच केली आहे. ही टीव्ही सिरीज 55 इंच, 65 इंच आणि 75 इंच अशा तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. 3840×2160 पिक्सेल रिझोल्युशनसह येणाऱ्या अँड्रॉइड स्मार्ट TVमध्ये अल्ट्रा HD LED स्क्रीन उपलब्ध आहे. हे उपकरण HDR, Dolby Vision आणि Dolby Atmos ला देखील सपोर्ट करते. टीव्हीला स्क्रीनच्या मागे थ्री-साइड एलईडी लाईट्स बिल्ट इन आहेत.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! SAMSUNG च्या फोनवर पहिल्यांदाच मिळतेय इतकी जबरदस्त ऑफर, वाचा सविस्तर

Philips 7900 Ambilight Android TV फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

स्मार्ट टीव्हीमध्ये थ्री-साइड अँबिलाइट LED लाईट्स मिळतात. जे टीव्हीच्या मागे असतात आणि आकर्षक इफेक्ट्स देतात.अँबिलाइट LED लाईट देखील त्या कलरमध्ये चमकतात, जो कलर TV मध्ये दिसत असतो. हे लाईट्स रिमोटच्या मदतीने नियंत्रित करता येतात, तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला हे लाईट्स बंदही करता येईल.

Philips 7900 Ambilight Android TV अल्ट्रा HD LED स्क्रीनसह येतो. जो 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. यामध्ये HDR10+, HDR10, HLG डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ऍटमॉससारख्या उच्च डायनॅमिक कंटेंट रेंजचे सपोर्ट आहे. याशिवाय, यात 20W चा साउंड आउटपुट आणि डिस्प्लेमध्ये 60Hz चा रिफ्रेश रेट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये ब्लूटूथ 5 आणि ड्युअल-बँड Wi-Fi ला सपोर्ट करतो.

टीव्हीमध्ये नवीन स्टॉक Android आधारित टीव्ही यूजर इंटरफेस मिळतो. यामध्ये गुगल प्ले स्टोअरच्या मॅन ऍप  आणि स्ट्रीमिंग सेवांचा वापर करता येईल. टीव्हीच्या रिमोटमध्ये गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन गुगल क्रोमकास्टचा पर्यायही देण्यात आला आहे.

Philips 7900 Ambilight Android TV ची किंमत

ही Android TV सिरीज तीन साईज ऑप्शनमध्ये लाँच केली गेली आहे. 55-इंच साईजसाठी किंमत 99,990 रुपये, 65-इंच साईजसाठी 1,49,990 रुपये आणि 75-इंच साईजसाठी 1,89,990 रुपये आहे. हा टीव्ही ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट, ऑफलाइन रिटेल स्टोअर्स, फिलिप्स सेल्स आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्कद्वारे खरेदी केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo