Oppo ने आपला नवीन TV बाजारात लाँच केला आहे. हा कंपनीच्या K9x स्मार्ट टीव्ही सिरीजचा भाग आहे. Oppo चा नवीन TV 50 इंच स्क्रीन साईजमध्ये येतो. या सिरीजअंतर्गत कंपनीने यापूर्वी 65 इंच साईजचा टीव्ही लाँच केला आहे. नवीन टीव्हीमध्ये 4K रिझोल्यूशनसह क्वाड-कोर मीडियाटेक चिपसेट देण्यात आला आहे. कंपनी टीव्हीमध्ये डॉल्बी साउंड देखील देत आहे, ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या सिनेमा हॉलची मजा येईल.ओप्पोचा हा टीव्ही नुकताच चीनमध्ये लाँच झाला आहे. त्याची किंमत 1399 युआन म्हणजेच सुमारे 16,400 रुपये आहे.
हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy Unpacked 2022: नवीन फोल्डेबल फोन्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
कंपनी या टीव्हीमध्ये 50-इंच लांबीचा 4K डिस्प्ले देत आहे. हे LED बॅकलिट पॅनेल 10.7 बिलियन कलर्स आणि ब्लु लाईट कमी करण्याच्या टेक्नॉलॉजीसह येतो. नवीन टीव्हीमध्ये कंपनी फ्लॅगशिप स्मार्ट TV प्रमाणे डिस्प्ले लेव्हल कलर ऍक्युरेसी ऑफर करत आहे. या नवीन 50-इंच लांबीच्या टीव्हीमध्ये तुम्हाला 280 nits ची पीक ब्राइटनेस मिळेल. हे उपकरण 2 GB रॅम आणि 16 GB इंटर्नल स्टोरेजसह येईल.
कंपनी टीव्हीमध्ये क्वाड-कोर मीडियाटेक चिपसेट देत आहे. ओप्पोच्या या सिरीजची साउंड कॉलिटी उत्कृष्ट आहे. यामध्ये कंपनी डॉल्बी ऑडिओ आणि स्क्रीन साउंडसह 20 डब्ल्यू स्पीकर सिस्टम देत आहे. Oppo चा हा TV लेटेस्ट ColorOS TV ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी या TV मध्ये ती HDMI पोर्ट आणि एक इथरनेट पोर्ट देण्यात आला आहे. यात वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड Wi-Fi देखील आहे. टीव्हीची आणखी एक विशेषता म्हणजे याला Xiaobu व्हॉईस असिस्टंटनेही नियंत्रित केले जाऊ शकते.