OnePlus हा टेक्नॉलॉजीच्या दुनियेतील लोकप्रिय ब्रँड आहे. या ब्रँडने भारतीय बाजारात स्मार्टफोनद्वारे एंट्री केली होती. त्यानंतर हळू-हळू कंपनीने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. तुम्हाला कंपनीचे स्मार्टफोन, स्मार्ट TV, इयरबड्स, स्मार्टवॉच अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळतील. दरम्यान, कंपनीने आपल्या स्मार्ट TV पोर्टफोलिओमध्ये आणखी एक अफोर्डेबल ऑप्शन जोडला आहे. OnePlus Y1S TV चे 32 आणि 43 इंच स्मार्ट TV आधीच लाँच झाले आहेत. यात आता कंपनीने 40 इंच लांबीचा TV सुद्धा लाँच केला आहे.
OnePlus Y1S TV आता तीन साईजमध्ये उपलब्ध आहे. ब्रँडचा नवा TV आता 40 इंच साईजमध्ये लाँच करण्यात आला आहे. नव्या TVची किमंत 21,999 रुपये आहे. नवा TV ऑनलाईन स्टोअर, Amazon इंडिया, फ्लिपकार्ट इ. कडे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 14 एप्रिलपासून या TVची सेल सुरु होणार आहे.
OnePlus TV Y1S सिरीजच्या नव्या TVमध्ये तेच फीचर्स मिळतात, जे 43 इंच साईजच्या TVमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये फुल HD डिस्प्ले आहे, जो तीन बेजल्ससह येतो. TVमध्ये HDR10, HDR10+ HLGचे सपोर्ट आहे. यामध्ये तुम्हाला डॉल्बी ऑडिओचे सपोर्टदेखील मिळेल. या बजेट TVमध्ये तुम्हाला 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज सपोर्ट मिळेल. हे डिवाइस Android TV 11 बेस्ड आहे.
TVसह तुम्हाला एक ब्लूटूथ रिमोट मिळेल, जो Netflix, Prime Video, Google assistant हॉटकीजसह येईल. TVमध्ये ड्युअल बंद WiFi, गुगल असिस्टंट, इनबिल्ट क्रोमकास्ट आणि दुसरे ऑप्शन्सदेखील मिळतील.