OnePlus TV 65 Q2 Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

Updated on 10-Feb-2023
HIGHLIGHTS

OnePlus TV 65 Q2 Pro अखेर भारतात लाँच

या 65-इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या प्री-ऑर्डर 6 मार्चपासून सुरू होतील.

या टीव्हीची थेट स्पर्धा भारतातील Samsung, या ब्रँडशी असणार आहे.

OnePlus ने अखेर आपला 65 इंच लांबीचा स्मार्ट TV OnePlus TV 65 Q2 Pro भारतात लाँच केला आहे. कंपनीने हा टीव्ही क्लाउड 11 लॉन्च इव्हेंटमध्ये सादर केला, जिथे या व्यतिरिक्त OnePlus 11 5G, OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Keyboard 81 Pro आणि Oneplus Pad 5G देखील लॉन्च केले गेले. चला बघुयात TV बद्दल सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : तारीख नोट करा ! Xiaomi 13 Pro फ्लॅगशिप फोनची लाँच डेट जाहीर…

OnePlus TV 65 Q2 Pro

OnePlus TV 65 Q2 Pro हा कंपनीचा फ्लॅगशिप टीव्ही आहे. मागील आवृत्तीच्या तुलनेत, कंपनीने नवीन टीव्हीमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फीचर्सच्या बाबतीत बरेच अपग्रेड केले आहे. 65 इंच लांबीचा QLED डिस्प्ले असलेला हा टीव्ही 120Hz रिफ्रेश रेटसह 4K कॉलिटी इमेज देतो. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 3840 x 2160 पिक्सेल आहे. कंपनीचा हा टीव्ही OxygenPlay 2.0 वर चालतो जो Android वर आधारित आहे.

OnePlus TV 65 Q2 Pro TV AVI, MKV, MP4 आणि WMV व्हिडिओ फॉरमॅटसह डॉल्बी ATMOS साउंडला सपोर्ट करतो. 70W 2.1 चॅनेल साउंडबारसह येत आहे, OnePlus TV 65 Q2 Pro वाय-फाय सपोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

OnePlus TV 65 Q2 Pro ची भारतात किंमत

OnePlus TV 65 Q2 Pro भारतात 99,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. या 65-इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या प्री-ऑर्डर 6 मार्चपासून सुरू होतील. TV 10 मार्च रोजी विक्रीसाठी आणले जाईल. या टीव्हीची थेट स्पर्धा भारतातील Samsung, Sony या ब्रँडशी असणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :