OnePlus ने नुकताच एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. कंपनीचा नवा टीव्ही हा अफोर्डेबल रेंज आणि Y-सिरीजचा भाग आहे. ब्रँडने OnePlus TV 50 Y1S Pro लाँच केला आहे, जो 50-इंच स्क्रीन साईजसह येतो. वनप्लस भारतीय बाजारात सतत नवीन प्रोडक्ट्स लाँच करत आहे. कंपनीने विविध सेगमेंटमध्ये अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. अगदी नवीन टीव्ही 35 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये येतो.
हे सुद्धा वाचा : Realme ने भारतात लाँच केला फास्ट चार्जिंगआणि मजबूत प्रोसेसर असलेला फ्लॅगशिप फोन, जाणून घ्या किंमत
सेलमध्ये, ग्राहकांना बँक डिस्काउंट, नो-कॉस्ट EMI आणि इतर ऑफर मिळत आहेत. चला जाणून घेऊया OnePlus TV 50 Y1S Pro ची किंमत आणि खास गोष्टी…
OnePlusच्या या TV ची किंमत 32,999 रुपये आहे. हा टीव्ही तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर खरेदी करू शकता. विक्री आज म्हणजेच 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली. Amazon व्यतिरिक्त, तुम्ही OnePlus.in, OnePlus Experience Store आणि इतर ऑफलाइन पार्टनर्सकडून स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.
Axis Bank क्रेडिट आणि डेबिट कार्डवर स्मार्ट टीव्हीवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तुम्हाला EMI व्यवहारांवरही सूट मिळेल. ग्राहक 9 महिन्यांच्या विनाशुल्क EMI वर स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. ऍमेझॉनवरून टीव्ही खरेदी केल्यावर वापरकर्त्यांना एक वर्षाचे ऍमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनही मिळेल.
OnePlus TV 50 Y1S Pro मध्ये, तुम्हाला 50-इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल, जो 4K रिझोल्यूशन आणि 10-बिट पॅनेलसह येतो. यात MEMC, ALLM आणि इतर फीचर्स आहेत. डिव्हाइस HDR10+, HDR10 आणि HLG सपोर्टसह येतो.
इतर OnePlus TV प्रमाणे, यात देखील Gamma इंजिन आहे, जो डिस्प्ले कॉलिटी सुधारतो. ऑडिओसाठी, यात 24W स्पीकर आहेत, जे डॉल्बी ATMOS सपोर्टसह येतात. टीव्हीमध्ये 64-बिट प्रोसेसर, 2GB RAM आणि 8GB स्टोरेज आहे.
स्मार्ट टीव्ही Android 10 वर आधारित आहे. यात दोन USB 2.0 पोर्ट, तीन HDMI 2.1 पोर्ट आणि इतर पर्याय आहेत. डिव्हाइस वायरलेस रिमोट, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, Google Duo, DLAN आणि Miracast सह येतो.