फक्त 8000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झाले नवे Smart TV, मोठ्या टीव्हीसह घ्या थिएटरची मज्जा!

Updated on 12-Dec-2024
HIGHLIGHTS

Daiwa ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली Smart TV लाँच केले.

स्मार्ट टीव्ही 32-इंच आणि 43-इंच डिस्प्ले साईजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

Daiwa चे नवे 32-इंच आणि 43-इंच दोन्ही स्मार्ट टीव्ही मॉडेल्स स्लिम बेझल्ससह एज-टू-एज डिझाइनसह येतात.

प्रसिद्ध टेक जायंट Daiwa ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली Smart TV लाँच केले आहेत. हे कुलीटा स्मार्ट टीव्ही 32-इंच आणि 43-इंच डिस्प्ले साईजमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीने हे स्मार्ट टीव्ही अगदी कमी किमतीत सादर केले आहेत. हे टीव्ही स्लिम बेझल आणि क्वाड-कोर प्रोसेसर, आय-केअर मोड, ऍपल एअरप्ले सपोर्ट यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज आहेत. जाणून घेऊयात या नवीन Daiwa TV ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Lava O3 Pro: देशी कंपनीचा नवा स्मार्टफोन Powerful फीचर्ससह होणार लाँच! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी

नव्या Daiwa स्मार्ट टीव्हीची किंमत

नवीन Daiwa 32-इंच लांबीचा HD रेडी टीव्ही मॉडेल क्रमांक D32H1COC स्मार्ट टीव्ही 7,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, Daiwa 43-इंच लांबीचा फुल HD टीव्ही मॉडेल क्रमांक D43F1COC स्मार्ट टीव्ही 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे स्मार्ट टीव्ही 1 वर्षाची वॉरंटी आणि बँक ऑफरसह Flipkart वरून खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Daiwa स्मार्ट टीव्हीचे सर्व तपशील

Daiwa चे नवे 32-इंच आणि 43-इंच दोन्ही स्मार्ट टीव्ही मॉडेल्स स्लिम बेझल्ससह एज-टू-एज डिझाइनसह येतात. हे स्मार्ट टीव्ही एक इमर्सिव्ह व्युइंग एक्सपेरियंस प्रदान करतात. दोन्ही मॉडेल्समध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे, जो टीव्ही शो, चित्रपट आणि गेम्ससह बहुतेक कंटेंटसाठी चांगली स्पीड सुनिश्चित करतो. यात टीव्हीमधेय सात पिक्चर मोड आहेत, जे वापरकर्त्यांना कंटेंट टाईपनुसार उदा. मुव्ही, गेम्स, स्पोर्ट्स इ. पिक्चर सेटिंग्ज समायोजित करण्यास अनुमती देतात.

याव्यतिरिक्त, या टीव्हीमध्ये दोन बॉक्स स्पीकर आहेत, जे एकूण 20W ऑडिओ आउटपुट देतात. हे टीव्ही तुमच्या लिव्हिंग रूम किंवा बेडरूमसाठी उत्तम साउंड एक्सपेरियन्स सुनिश्चित करतात. दोन्ही मॉडेल्समध्ये क्वाड-कोर प्रोसेसर आहे, जो सुरळीत कामगिरी, मल्टीटास्किंग आणि जलद प्रतिसाद देतो. विशेष म्हणजे Daiwa स्मार्ट टीव्ही प्री-लोडेड OTT प्लॅटफॉर्म्स उदा. Prime Video, Sony LIV, ZEE 5 आणि You-Tube सह येतात, जे तुम्हाला चित्रपट, शो आणि व्हिडिओंमध्ये सहज ऍक्सेस देतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :