Infinix ने भारतात परवडणारा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. कंपनीच्या या टीव्हीचे नाव Infinix 32-इंच Y1 स्मार्ट टीव्ही आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्ट टीव्हीची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. ब्रँडचा दावा आहे की, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात परवडणारा स्मार्ट टीव्ही आहे. Infinix ने गेल्या वर्षी भारतात स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केला आणि X1 आणि X3 सीरीज अंतर्गत 32-इंच ते 43-इंच पर्यंतचे अनेक फुल HD टीव्ही लाँच केले आहेत.
हे सुद्धा वाचा : मस्तच ! 3 दिवस चालणाऱ्या बॅटरीसह Nokia चा स्वस्त स्मार्टफोन लाँच, त्यासोबत मिळतायेत मोफत इअरबड्स
नवीन Infinix 32-इंच Y1 स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर विकला जाईल आणि तुम्हाला प्रारंभिक लाँच ऑफर अंतर्गत अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते, ज्यामुळे टीव्हीची किंमत 8,000 रुपयांच्या जवळ जाईल. चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती…
Infinix 32-इंच Y1 स्मार्ट टीव्हीची किंमत 8,999 रुपये आहे. हा टीव्ही 18 जुलैपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा टीव्ही ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांसह ग्राहक 900 रुपयांपर्यंत (10% सूट) मिळवू शकतात. याशिवाय, तुम्ही फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डसह 5% अमर्यादित कॅशबॅक देखील मिळवू शकता. त्यानंतर तुम्ही केवळ 8,099 रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.
Infinix 32-इंच Y1 32-इंच HD रिझोल्यूशन (1366 x 768 पिक्सेल) आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. टीव्ही डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 20W स्पीकर सेटअपसह येतो. Infinix TV थिन बेझलसह येतो. स्मार्ट टीव्ही क्वाड-कोर प्रोसेसर, 512 MB रॅम आणि 4 GB स्टोरेजसह येतो. प्राईम व्हिडिओ, Zee5, YouTube, SonyLIV, आणि इतर यांसारखे ऍप्स स्मार्ट टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहेत.
या टीव्हीमध्ये तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, एक ऑप्टिकल पोर्ट, एक LAN पोर्ट, Miracast आणि Cast पर्यायांचा समावेश आहे. त्याबरोबरच, रिमोटमध्ये YouTube, ब्राउझर आणि प्राइम व्हिडिओसाठी हॉट की मिळेल.