CES 2016 मध्ये नेटफ्लिक्सचे संस्थापक Reed Hastings यांनी भारतात नेटफ्लिक्स सेवा सुरु करण्यात आल्याची घोषणा केली. ह्याच्या बेसिक प्लान ज्यात HD क्वालिटी नाही, त्याच्या सदस्य नोंदणीसाठी ५०० रुपये, HD क्वालिटीसाठी ६५० रुपये आणि अल्ट्री HD साठी ८०० रुपये मोजावे लागतील. बेसिक प्लानमध्ये त्याचा प्रवाह केवळ एकाच स्क्रीनवर राहिल. स्टँडर्ड प्लानमध्ये दोन सारखे प्रवाह आणि प्रीमियम प्लानमध्ये ४ सारखे प्रवाह राहतील. हे सर्व प्लान्स आपण लॅपटॉप्स, टीव्ही, फोन्स, टॅबलेट्स आणि डिस्प्लेमध्ये प्लग केलेल्या डोंगल्समध्ये(क्रोमकास्ट आणि रोकू) पाहता येतील. आणि ह्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे पहिला १ महिना मोफत असेल.
भारताशिवाय नेटफ्लिक्स ही सेवा चायना सोडून नायझेरियास अझरबैजान, पोलंड, रशिया, सिंगापूर, इंडोनेशिया इ. जवळपास १३० नवीन देशांमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे, की ह्या देशांच्या यादीत आपल्या देशाचाही समावेश झाला आहे.
नेटफ्लिक्स ऑफलाइन मिडिया वितरण सेवा आता ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवेमध्ये विकसित करण्याच्या मार्गावर आहे, असे झाल्यास ही बाजरातील सर्वोत्कृष्ट अशी सेवा देणारी कंपनी ठरेल. आतापर्यंत ही सेवा केवळ उत्तर आणि दक्षिण अमेरिका. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमधील सदस्यांसाठीच उपलब्ध करण्यात आली आहे.
नेटफ्लिक्स उत्कृष्ट अशा आंतरराष्ट्रीय सिनेमे आणि टीव्ही शोजचा समावेश आहे. त्याचबरोबर आकर्षक हाउस ऑफ कार्ड्स, नारकोज, मार्वेल्स डेअरडेविल आणि जेसिका जोन्स आणि ऑरेंज इज द न्यू ब्लॅक अशी ओरिजनल प्रोडक्शनचा समावेश आहे.
सदस्य प्लान आणि कन्टेंट
नेटफ्लिक्सचे सदस्य प्लान्स खूपच चांगले आणि आपल्या बजेटमध्ये येणारे आहे. आणि मुळात म्हणजे ह्यात व्हिडियो पुर्ण HD (1080p) किंवा त्यापेक्षाही चांगल्या प्रकारात उपलब्ध आहे, जे भारतातील अन्य कुठलाही प्रदाता देत नाही. येथे अनेक इंडियन स्ट्रिमिंग सेवा आहेत, ज्यात BoxTV, Spuul, BIGFlix, Eros Now, HotStar, Hungama Play इत्यादींचा समावेश आहे जे आपल्याला भरपूर रिजनल कन्टेंट देतात. त्यामुळे नेटफ्लिक्स त्यांना संघटीत करुन ह्या इंडियन कन्टेंट्सन आपल्या माध्यमातून समोर आणणार. आम्ही खाली DTH सेवा प्रदात्यांनी HD पॅक्ससाठी किती पैसे आकारले आहेत, याची यादी दिली आहे.
Provider | Pack Name | Cost (Rs.) |
Videocon | Platinum HD | 608 |
DishTV | New Titanium | 499 |
TataSKY | Ultra HD | 730 |
Airtel | Magnum | 675 |
SunDirect | HD+ Mega | 500 |
ह्या सर्व पॅक्समध्ये स्पोर्ट्स चॅनल्सचाही समावेश करण्यात आला आहे, जे नेटफ्लिक्सजवळ नाही हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. तसेच वरील सर्व सेवा प्रदाते जर कोणी वर्षाचे पॅकेज घेतल्यास त्या सदस्याला खास डिस्काउंटही देणार आहे. तसेच काही भारतीय चॅनेल्ससाठी कन्टेंट सारखाच राहिल.