कंपनीने 32 इंच, 43 इंच आणि 55 इंच मॉडेल्स लाँच केले आहेत.
नव्या टीव्हीची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये
Motorola ने ग्राहकांसाठी Motorola Envision Series भारतात लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने 32 इंच, 43 इंच आणि 55 इंच मॉडेल्स लाँच केले आहेत. कंपनीच्या या लेटेस्ट टीव्ही मॉडेलची किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे. या टीव्ही मॉडेल्समध्ये तुम्हाला कोणते फीचर्स पाहायला मिळतील, ते बघुयात.
Motorola Envision Series ची किंमत
या TV सीरिजच्या 32-इंच लांबीच्या टीव्ही मॉडेलची किंमत 9,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर 43-इंच लांबी च्या फुल HD मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तर 43 इंच 4K टीव्ही मॉडेलची किंमत 21 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि शेवटी सर्वात मोठ्या आकाराच्या 55 इंच 4K टीव्हीची किंमत 31 हजार 999 रुपये आहे.
हा टीव्ही फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
Motorola Envision Series चे स्पेक्स
32-इंच मॉडेल HD रेडी आहे, जे तुम्हाला 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशन देईल. तर, 43-इंच लांबीचा टीव्ही फुल HD डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. याशिवाय, कंपनीने ही टीव्ही सीरीज क्वाड कोअर मीडियाटेक प्रोसेसर आणि 8GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केली आहे. तर, रॅम बद्दल बोलायचे झाल्यास, HD आणि Full HD व्हेरिएंटमध्ये 1GB रॅम उपलब्ध असेल, तर 4K मॉडेलमध्ये 2GB रॅम उपलब्ध असेल.
याव्यतिरिक्त, ही नवीनतम टीव्ही सिरीज Android TV 11 वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला या सिरींजमध्ये 2 USB 2.0 पोर्ट आणि इथरनेटसह अनेक उपयुक्त फीचर्स मिळतात. दर्जेदार आवाजासाठी यात 20W स्पीकर देण्यात आले आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.