अरे बापरे! जगातील सर्वात मोठा 115 इंच Smart TV भारतात लाँच, किंमत पाहून बसेल धक्का
TCL कंपनीचे Smart TV भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.
TCL ने भारतात जगातील सर्वात मोठा 115 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे.
लाँच ऑफरबद्दल TCL या लेटेस्ट टीव्हीच्या खरेदीवर 75-इंच लांबीचा QLED टीव्ही पूर्णपणे मोफत
प्रसिद्ध टेक कंपनी TCL कंपनीचे Smart TV भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, TCL ने भारतात जगातील सर्वात मोठा 115 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा जगातील सर्वात मोठ्या स्क्रीन आकाराची टीव्ही असल्याचा, कंपनीचा दावा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या TV मध्ये तुम्हाला 144Hz रिफ्रेश रेटसह स्क्रीन मिळेल. शिवाय, टीव्ही AiPQ Pro प्रोसेसरने सुसज्ज आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नवीनतम TCL टीव्हीची किंमत, उपलब्धता आणि तपशील-
TCL 115-inch QD Mini LED TV ची किंमत
TCL ने TCL 115-इंच QD Mini LED TV (115X955) असे या प्रोडक्टला नाव दिले आहे. भारतात 29,99,990 रुपयांच्या किमतीत हा Smart TV लाँच करणात आला आहे. हा टीव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मोठे बजेट प्लॅन करावे लागेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, Amazon, Flipkart वर टीव्हीची विक्री सुरू होईल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास TCL या टीव्हीच्या खरेदीवर 75-इंच लांबीचा QLED टीव्ही पूर्णपणे मोफत देत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
TCL 115-inch QD Mini LED TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
TCL QD Mini LED TV मध्ये 115-इंच लांबीची मोठी स्क्रीन आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 144Hz इतका आहे. या डिस्प्लेमध्ये 4K रिझोल्यूशन आहे. त्याबरोबरच, यात HDR5000 nits, HDR10, TUV ब्लू लाईट आणि TUV फ्लिकर फ्री सपोर्ट देखील TV मध्ये आहे. याव्यतिरिक्त, यात लोकल डिमिन्ग झोन्स आहेत, जे तुम्हाला एक उत्तम वास्तववादी पाहण्याचा अनुभव देतील. विशेष म्हणजे गेमर्ससाठी टीव्हीमध्ये गेम मास्टर तंत्रज्ञान देण्यात आले आहे. याशिवाय, यात ALLM म्हणजेच ऑटो लो लेटन्सी मोड उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, हा टीव्ही T-स्क्रीन अल्ट्रा टेक्नॉलॉजीसह येतो, जो हाय कॉन्ट्रास्ट लेव्हल प्रदान करतो. वर सांगितल्याप्रमाणे, हा टीव्ही AiPQ Pro प्रोसेसरने सुसज्ज आहे. ऑडिओसाठी, टीव्हीला ONKYO 6.2.2 हाय-फाय सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे, ज्याद्वारे तुम्हाला सिनेमासारखा साउंड एक्सपेरियन्स मिळेल. यासोबतच पिक्चर, व्हिडिओ आणि ऑडिओसाठी टीव्हीमध्ये अनेक AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत. लाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जरा घाई करावी लागेल. अधिक माहितीसाठी TCL च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile