फक्त 20,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 43 इंच लांबीचे Smart TV, स्वस्तात मिळेल थिएटरची मज्जा!

Amazon India वर 43 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध
43 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही 20,000 रुपयांच्या बजेट किमतीत येतात.
Kodak, VW इ. ब्रँड्सचे स्मार्ट TV यादीमध्ये समाविष्ट
नव्या वर्षात तुम्हाला देखील आपल्या घरासाठी नवा Smart TV खरेदी करायचा असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. 43 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला स्वस्तात घरबसल्या थिएटरची मज्जा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर 43 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे स्मार्ट टीव्ही 20,000 रुपयांच्या बजेट किमतीत येतात. सर्वोत्तम टीव्ही पर्यायांची यादी आम्ही तुमच्यासाठी तयार केली आहे. पाहुयात यादी-
Also Read: iQOO 12 5G Offers: फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध स्मार्टफोनवर तब्बल मिळतोय तब्बल 5000 रुपयांचा Discount
VW 43 inches Linux Series
VW 43 inches Linux Series स्मार्ट टीव्ही Amazon वर 13,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्ट टीव्ही 679 रुपयांना EMI वर खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 1920x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन मिळेल. तर, तुम्हाला 60Hz रिफ्रेश रेट येणार डिस्प्ले मिळणार आहे. यात 2 HDMI आणि 2 USB प्रकारचे पोर्ट देखील उपलब्ध आहेत. उत्तम साउंडसाठी टीव्हीमध्ये स्टीरिओ स्पीकर्स आतील. त्याबरोबरच, या टीव्हीमध्ये Prime Video, YouTube, Zee5, Sony Liv सारखे अॅप्स देखील इनबिल्ट आहेत.
Kodak 43 inches 9XPRO Series
Kodak 43 inches 9XPRO Series ची किंमत Amazon वर 16,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा टीव्ही 824 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करता येईल. तसेच, HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्ट टीव्हीमध्ये 1920x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह स्क्रीन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, 2 USB पोर्ट आणि 3 HDMI पोर्ट उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यात Netflix, Prime Video, YouTube, Zee5 ऍप्स इ. उपलब्ध आहेत.
SKYWALL 43 inches Full HD LED Smart TV
SKYWALL 43 inches Full HD LED स्मार्ट टीव्हीची किंमत 12,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्ट टीव्ही 630 रुपयांच्या मासिक हप्त्यासह खरेदी करता येईल. या स्मार्ट टीव्हीमध्ये बिल्ट-इन Wi-Fi दिले आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल व्हॉइस असिस्टंट उपलब्ध आहे. याव्यतिरीक्त, या टीव्हीमध्ये Netflix, YouTube, Prime Video, Hotstar, Sony LIV, JioCinema, Zee5, Eros Now सारखे प्री-लोडेड ऍप्स उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile