भारीच की ! Kodak ने लाँच केले तीन नवे TV, किंमत केवळ 6,499 रुपये

Updated on 09-May-2023
HIGHLIGHTS

Kodak ने Kodak SE अशी TV सिरीज लाँच केली आहे.

24 इंच मॉडेलची किंमत 6,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

टीव्ही Amazon वरून सहजपणे खरेदी केले जाऊ शकतात.

Kodak या भारतातील लोकप्रिय TV ब्रँडने आपला नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. Kodak ने Kodak SE अशी TV सिरीज लाँच केली आहे. या TV सिरीजमध्ये 24 इंच, 32 इंच आणि 40 इंच मॉडेल्सचा समावेश आहे. जर तुम्हाला किफायती रेंजमध्ये नवा TV खरेदी करायचा असेल तर, हा TV तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. चला तर जाणून घेऊयात किंमत, फीचर्स आणि स्पेक्स- 

24 इंच आणि 32 इंच TV मध्ये  HD डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, 40 इंच डिस्प्लेमध्ये फुल HD आणि बेझल लेस डिझाइन देण्यात आले आहे. याशिवाय, Wi-Fi आणि मिराकास्टचाही लाभ टीव्हीमध्ये उपलब्ध आहे. 

Kodak SE TV सिरीजची किंमत

Kodak SE TV च्या 24 इंच मॉडेलची किंमत 6,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, 32 इंच मॉडेलची किंमत 9,499 रुपये आणि 40 इंच मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. हे टीव्ही Amazon वरून सहजपणे खरेदी केले जाऊ शकतात.

Kodak SE TV

आम्ही तुम्हाला सांगतो की 40 इंच मॉडेल बेझेल कमी डिझाइन, 400 निट्स पर्यंत ब्राइटनेस आणि 178 डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगल उपलब्ध आहे. TV क्वाड कोर प्रोसेसरवर काम करतात, ज्यासोबत माली 450 GPU उपलब्ध आहे. तिन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रूसाऊंड सिस्टम आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI , Wi-Fi, दोन USB पोर्ट आणि मिराकास्ट आहेत.

TV लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. यात 0.5GB रॅम आणि 4GB इनबिल्ट स्टोरेज आहे. यात सोनी लिव्ह, झी 5, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओ सारखे ऍप्स प्री-इंस्टॉल केलेले आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट इनबिल्ट देखील देण्यात आला आहे. साउंड सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर 24-इंच आणि 32-इंचाच्या टीव्हीमध्ये 20-वॉटचा स्पीकर आणि 40-इंच लांबीच्या मॉडेलमध्ये 30 वॅटचा स्पीकर देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :