Kodak Matrix QLED TV series: तीन पावरफुल QLED टीव्ही 4K डिस्प्लेसह लाँच, जाणून घ्या किंमत

Updated on 14-Sep-2022
HIGHLIGHTS

Kodak Matrix QLED TV series भारतात लाँच

या TV सिरीजची सुरुवातीची किंमत 33,999 रुपये आहे

हे TV तीन साईजमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

Kodak ने आपली प्रीमियम टीव्ही सिरीज Matrix QLED सिरीज भारतात लाँच केली आहे. कंपनीच्या या नवीन सीरिजमध्ये 50 इंच, 55 इंच आणि 65 इंच टीव्हीचा समावेश आहे. कंपनीने 50-इंच टीव्हीची किंमत 33,999 रुपये ठेवली आहे. तर, 55-इंच टीव्हीची किंमत 40,999 रुपये आहे. जर तुम्ही 65-इंच लांबीच्या टीव्हीची किंमत 59,999 रुपये खर्च करावे लागतील. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये तुम्ही या कंपनीचे नवीनतम 4K QLED डिस्प्ले टीव्ही खरेदी करू शकता. 

हे सुद्धा वाचा :  iQOO Z6 Lite 5G ची पहिली सेल आज, प्रचंड डिस्काउंटसह फोन खरेदी करण्याची संधी…

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google TV वर काम करणार्‍या Kodak च्या नवीन टीव्ही सिरीजमध्ये तुम्हाला एक उत्तम 4K QLED डिस्प्ले मिळेल. 1.1 बिलियन्स कलरसह येणाऱ्या या टीव्हीची पिक्चर कॉलिटी आणखी सुधारण्यासाठी कंपनी त्यात डॉल्बी व्हिजन देखील देत आहे. नवीन टीव्ही तुम्हाला घरबसल्या थिएटरसारखी मजा देतील. यासाठी डॉल्बी ऑडिओ बॉक्स स्पीकरसह 40 वॉटचा साउंड आउटपुट देण्यात आला आहे.

याशिवाय DTS ट्रूसराऊंड ऑडिओ देखील यामध्ये आहे, ज्यामुळे टीव्हीचा आवाज खूप दमदार होतो. हे टीव्ही 2 GB रॅम आणि 16 GB इंटरनल मेमरीसह येतात. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MT9062 देत आहे. Chromecast सह, वापरकर्ते फोनवरून टीव्हीवर इतर कंटेंटशिवाय फोटो, व्हिडिओ आणि संगीत पाहू शकतात. हे टीव्ही बेझल-लेस आणि एअरस्लिम डिझाइनसह येतात, ज्यामुळे त्याचा लुक खूपच प्रीमियम होतो. टीव्हीसोबत, कंपनी Google असिस्टंटसह व्हॉईस इनबेल्ड रिमोट देखील देत आहे.

रिमोटमध्ये, तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि YouTube साठी डेडिकेटेड हॉटकी देखील मिळतील. तुम्ही टीव्हीमध्ये दिलेल्या गुगल टीव्ही ऍपद्वारे घरातील स्मार्ट लाईटही नियंत्रित करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी USB 2.0, HDMI 3 (ARC, CEC) आणि ब्लूटूथ सारखे ऑप्शन्स दिले आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :