Infinix ने भारतात आपली नवीन X3IN Android TV सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये 32-इंच आणि 43-इंच साईजचे टीव्ही लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही टीव्हीमध्ये अँटी-ब्लू रे टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे युजर्सच्या डोळ्यांना अजिबात त्रास होणार नाही.
या दोन्ही टीव्हीची सेल 18 मे पासून फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाइटवर सुरू होणार आहे. कंपनीने Infinix 32X3IN TV ची किंमत 9,799 रुपये ठेवली आहे. तर, त्याचा 43 इंच स्क्रीन साईजचा टीव्ही 16,999 रुपयांच्या किंमतीसह खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Infinix X3IN सिरीजचे स्मार्ट टीव्ही ग्राहकांसाठी 32-इंच आणि 43-इंच स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये FHD रिझोल्यूशन आहे आणि त्यांना MEMC, HLG आणि HDR चे समर्थन मिळाले आहे. यात तुम्हाला उत्कृष्ट पिक्चर कॉलिटी मिळणार आहे. उत्कृष्ट आवाजासाठी, कंपनीच्या दोन्ही नवीन टीव्हीमध्ये डॉल्बी सह 20W बॉक्स स्पीकर आहेत.
याशिवाय, टीव्हीमध्ये क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर आहे. तसेच, 1GB रॅम आणि 8GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. हे टीव्ही Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. यामध्ये गुगल प्ले-स्टोअरवर प्रवेश उपलब्ध आहे. Infinix चे दोन्ही लेटेस्ट टीव्ही Google Assistant ने सुसज्ज आहेत. या टीव्हीसोबत ब्लूटूथ सक्षम कॉम्पॅक्ट रिमोट उपलब्ध आहे. रिमोटमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि YouTube साठी बटन्स देण्यात आले आहेत.