जर तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Infinix च्या नुकत्याच लाँच झालेल्या SmartTV म्हणेजच Infinix Y1 Smart TV ची विक्री आजपासून सुरू होणार आहे. हा 32 इंच लांबीचा टीव्ही तुम्हाला सुमारे 8 हजार रुपयांमध्ये मिळू शकतो. चला जाणून घेऊयात या टीव्हीची किंमत आणि फीचर्स…
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Samsung चा कूल टॅब लवकरच होणार लाँच, कमी किंमतीत मिळेल 1TB पर्यंत स्टोरेज आणि बरेच काही
कंपनीने या स्मार्ट टीव्हीचा 32 इंच साईज 8,999 रुपये किमतीत लाँच केला आहे. फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून टीव्हीची विक्री सुरू होईल. या दरम्यान SBI बँक क्रेडिट कार्डधारकांना 10 % म्हणजेच 900 रुपयांची सूट मिळू शकते. यानंतर तुम्हाला फक्त 8,099 रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करता येईल.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Infinix च्या या SmartTV मध्ये 32-इंच लांबीचा पॅनल आहे. डिस्प्लेमध्ये 1366×768 पिक्सेलचे HD रिझोल्यूशन आणि 60Hz चा रिफ्रेश रेट आहे. यात स्लिम बेझल्स आहेत. ऑडिओ परफॉर्मन्ससाठी, यामध्ये 20W स्पीकर सेटअपसह डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे.
स्मार्ट टीव्हीमध्ये ZEE5, प्राइम व्हिडिओ, SonyLIC, YouTube, Aaj Tak सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल आहेत. हा Android स्मार्ट टीव्ही नाही आणि कंपनीच्या कस्टम-बिल्ट OS वर चालतो.