Infinix ने फक्त 13,999 रुपयांमध्ये लाँच केला 43 इंच स्मार्ट TV, घरात मिळेल अगदी थिएटरसारखा अनुभव
Infinix 43Y1 स्मार्ट टीव्ही लाँच
43 इंच स्मार्ट TV ची किंमत एकूण 13,999 रुपये
हा TV Flipkart वरून विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होणार
Infinix ने आपला नवीन स्मार्ट TV Infinix 43Y1 भारतीय बाजारात लाँच केला आहे. Infinix 43Y1 सोबत कंपनीने Infinix InBook X2 Plus लॅपटॉप देखील लाँच केला आहे. Infinix 43Y1 सह LED डिस्प्ले दिलेला आहे आणि डॉल्बी ऑडिओसाठी देखील सपोर्ट आहे. याशिवाय या टीव्हीमध्ये 20W चा स्पीकर देखील आहे. Infinix 43Y1 ची किंमत 13,999 रुपये आहे आणि ती Flipkart वरून विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
हे सुद्धा वाचा : Google Pixel 7: Google च्या फ्लॅगशिप फोनची पहिली विक्री आज, मिळतेय 8,500 रुपयांपर्यंत सूट
Itne price me ek 109cm(43) FHD Display, 300 NITS Brightness, Pre-loaded Entertainment apps, 20W Speakers and more, kaafi #BadiBaatHai!
The Infinix 43Y1 FHD SMART TV is here at an amazing price of Rs. 13,999. Sale starts soon only on @Flipkart, stay tuned!#Infinix43Y1 pic.twitter.com/nIGPHBXXsA
— Infinix India (@InfinixIndia) October 12, 2022
Infinix 43Y1 स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स
Infinix 43Y1 मध्ये फुल HD रिझोल्यूशनसह 43-इंच स्क्रीन आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 300 nits आहे आणि ती HLG सह vivid इमेजेसना देखील समर्थन देते. Infinix 43Y1 सह 20W स्पीकर प्रदान करण्यात आला आहे, जो डॉल्बी ATMOS ला देखील सपोर्ट करतो.
Infinix 43Y1 मध्ये क्वाड-कोर प्रोसेसर आणि 4GB स्टोरेज आहे. RAM बद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. Infinix 43Y1 दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, एक RF इनपुट, एक AV इनपुट आणि 3.5mm हेडफोन जॅक पॅक करतो. TV सोबत Wi-Fi आणि ब्लूटूथही देण्यात आले आहेत. Prime Video, Youtube, SonyLiv, Zee5, ErosNow सारखे ऍप्स Infinix 43Y1 मध्ये समर्थित असतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile