देशांतर्गत कंपनी Elista ने webOS TV सह अल्ट्रा-प्रीमियम स्मार्ट LED टीव्ही लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एकाच वेळी तीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. ज्यात 43-इंच, 50-इंच आणि 55-इंच मॉडेलचा समावेश आहे. सर्व टीव्हीसह webOS TV OS दिला गेला आहे. त्याबरोबरच, बेझललेस डिझाइन सर्व टीव्हीसह उपलब्ध असेल.
या स्मार्ट LED टीव्हीमध्ये ThinQ AI आहे. यामुळे वापरकर्त्याला मोबाईलवरून स्मार्ट टीव्ही वापरणे सोपे होईल. या टेक्नॉलॉजीसह, वापरकर्ते सहजपणे इनबिल्ट अलेक्साचा वापर करू शकतात आणि व्हॉइस कमांडसह हे डिव्हाइस मॅनेज करू शकतात.
हे सुद्धा वाचा : 'हे' आहेत Jio चे सर्वात स्वस्त आणि उत्तम स्पीडसह येणारे अनलिमिटेड इंटरनेट प्लॅन्स, जाणून घ्या किंमत
webOS TV द्वारे समर्थित एलिस्टा स्मार्ट LED टीव्ही मॅजिक रिमोटसह येतो. यामध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओसाठी स्वतंत्र हॉटकी देण्यात आल्या आहेत. टीव्हीची स्क्रीन ब्राइटनेस 400 nits पर्यंत आहे. सर्व टीव्ही 4K क्वांटम ल्युसेंट आणि 1.07 बिलियन कलर्ससह येतात. टीव्हीच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. TV मध्ये गेमिंगसाठी लो लेटन्सी मोड देखील उपलब्ध आहे.
लाँच दरम्यान एलिस्टाचे CEO पवन कुमार म्हणाले, “भारतातील स्मार्ट टीव्ही उद्योग अतिशय वेगाने वाढत आहे. आज ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये अतुलनीय अनुभव, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट टीव्ही पाहण्याचा अनुभव हवा आहे. ग्राहकांना सर्वोत्तम कॉलिटीचे प्रोडक्ट आणि त्यांच्या आवाक्यातील प्रीमियम प्रोडक्ट देणे, यावर आमचे पूर्ण लक्ष असून हेच आमच्या यशाचे मूळ आहे. स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये webOS TV द्वारे समर्थित एलिस्टा स्मार्ट LED टीव्ही लाँच करून, या श्रेणीतील आमचे यश आणखी उच्च पातळीवर नेण्याची आमची योजना आहे.
सर्व TV मध्ये डॉल्बी ऑडिओ आणि सराउंड साउंड उपलब्ध असतील. याशिवाय टीव्हीसोबत ड्युअल बँड WiFi देखील उपलब्ध असेल. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 43-इंच लांबीचा टीव्ही 48,990 रुपयांना, 50-इंच लांबीचा टीव्ही 59,990 रुपयांना आणि 55-इंच लांबीचा टीव्ही 70,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.