फ्री…! फ्री…! फ्री…! Samsung च्या 55 इंच जबरदस्त Smart TV वर दुसरा टीव्ही Free, धमाल ऑफर सुरु

Samsung चे स्मार्ट टीव्ही भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.
Samsung टीव्हीवर 10,000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे.
Samsung च्या 55 इंच लांबीच्या टीव्हीवर दुसरा स्मार्ट टीव्ही मोफत
साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक दिग्गज Samsung चे स्मार्ट टीव्ही भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी मोठा आणि प्रीमियम स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Samsung India च्या अधिकृत वेबसाइटवर सुरु असलेली लेटेस्ट ऑफर खास तुमच्यासाठी आहे. या खास डीलमध्ये 55 इंच लांबीच्या सॅमसंग टीव्हीवर केवळ हजारो रुपयांची सवलतच नाही तर, एक Smart TV ही मोफत मिळणार आहे.
Also Read: Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x ची पहिली सेल आज, जाणून घ्या Best ऑफर्स
होय, केवळ एका स्मार्ट टीव्हीची किंमत देऊन तुम्ही दुसरे टीव्ही घरी मोफत मिळवू शकता. मात्र, ही डील केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ही डील केवळ स्टॉक असेपर्यंतच वैध असणार आहे. म्हणूनच तुम्हाला घाई करावी लागेल.
Samsung QLED LS03D 4K The Frame Smart TV (2024) वर ऑफर
Samsung च्या अधिकृत साइटवर 1.38m (55) QLED LS03D 4K द फ्रेम स्मार्ट टीव्ही (2024) कंपनीच्या वेबसाइटवर या सॅमसंग टीव्हीची किंमत 97,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 10,000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. ज्यासाठी तुम्हाला फक्त टीव्ही कार्टमध्ये ऍड करावा लागेल. त्यानंतर, या टीव्हीची किंमत थेट 10,000 रुपयांनी कमी होईल.
एवढेच नाही तर, बँक ऑफरमध्ये या टीव्हीवर 5000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. जर तुम्ही टीव्ही खरेदी करण्यासाठी सॅमसंग Axis बँक कार्ड वापरून पैसे दिले तर तुम्हाला 10% कॅशबॅक मिळेल. वर सांगितल्याप्रमाणे, यासह आणखी एक टीव्ही मोफत मिळणार आहे.
Samsung FHD TV (UA32T4350BKXXL) मिळतोय मोफत
Samsung च्या अधिकृत साईटवर दिलेल्या ऑफर अंतर्गत हा टीव्ही खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना 24,900 रुपयांचा मोफत FHD टीव्ही (UA32T4350BKXXL) मिळणार आहे. हा टीव्ही 32 इंच लांबीचा HD रेडी टीव्ही आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1366X 786 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. या सॅमसंग टीव्हीमध्ये तुम्हाला आर्ट मोड, मॅट डिस्प्ले आणि आधुनिक फ्रेम डिझाइन मिळेल. हा सॅमसंग टीव्ही टिझेन OS वर देखील काम करतो. पॅकेजिंगमध्ये 1 LED टीव्ही, 1 टेबल टॉप स्टँड, 1 युजर मॅन्युअल, 1 वॉरंटी कार्ड आणि 1 रिमोट कंट्रोल समाविष्ट आहे.
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, यात दोन HDMI पोर्ट आहेत. ज्यांच्या मदतीने सेट टॉप बॉक्सशी कनेक्शन करता येईल. या टीव्हीमध्ये स्मार्ट फीचर्स म्हणून व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, स्मार्टथिंग्ज ऍप, पर्सनल कॉम्प्युटर मोड, होम क्लाउड, लाईव्ह कास्ट, स्क्रीन शेअर आणि म्युझिक सिस्टम सारखी आधुनिक फंक्शन्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile