तुम्हाला देखील आपल्या घरी नवीन TV घ्यायचा असेल तर LG हा एक लोकप्रिय स्मार्ट टीव्ही ब्रँड आहे. सोन्याहून पिवळे म्हणजे सध्या फ्लिपकार्ट डीलमध्ये 32-इंच लांबीचा HD रेडी स्मार्ट TV निम्म्यापेक्षा कमी किमतीत सेलसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या TV बद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
LG च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 21,990 रुपये आहे. पण हा टीव्ही फ्लिपकार्टवर 36% डिस्काउंटसह विकला जात आहे. म्हणजेच हा TV 13,999 रुपयांना साईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. HDFC बँक क्रेडिट कार्डने टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त 1,250 रुपयांची सूट मिळण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, TV ला 1,556 रुपयांच्या मासिक EMI ऑप्शनवर देखील खरेदी करता येणार आहे. त्याबरोबरच, टीव्हीच्यावर 7000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. म्हणजेच जुना टीव्ही देऊन 7000 रुपयांपर्यंत सूट आणखी मिळवू शकता. यानंतर, टीव्हीची किंमत केवळ 6,999 रुपये होईल.
LG चा 32 इंच लांबीचा HD रेडी LED स्मार्ट टीव्ही LG च्या WebOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या टीव्हीला 50Hz स्क्रीन रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये HD रेडी म्हणजेच 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशन देखील आहे. Netflix, Prime Video, Disney+ Hotstar आणि YouTube सारखे ऍप्स TVमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. टीव्हीचे साउंड आउटपुट 10W आहे.