Smart TV Deal: नवीन वर्षात तुम्हालाही घरच्यांसाठी नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा आहे? तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण, तुम्हाला केवळ 17 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 4K टीव्ही मोठ्या 43 इंच साईजमध्ये मिळणार आहे. होय, Flipkart ने एक आकर्षक डील सादर केली आहे. प्रसिद्ध टेक कंपनी Daiwa चा 43 इंच QLED 4K स्मार्ट गुगल टीव्ही फक्त 16,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील-
Also Read: आगामी Poco X7 सिरीजची भारतीय लाँच डेट Confirm! 32MP फ्रंट कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स
Daiwa चा 43-इंच लांबीचा QLED Ultra HD 4K Smart Google TV Flipkart वर स्वस्त दरात विकला जात आहे. हा स्मार्ट टीव्ही 21,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. परंतु, सध्या तो केवळ 17,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच हा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर तब्बल 4000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक पिक्सेल कार्डद्वारे पेमेंट व्यवहारांवर 2,000 रुपयांची सूट मिळेल. तर, सामान्य HDFC बँकेचे क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांची सूट आणि हीच सवलत फेडरल बँक क्रेडिट कार्डवरही मिळेल. लक्षात घ्या की, किंमत आणि ऑफर्स बदलत राहू शकतात. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
या Daiwa स्मार्ट टीव्हीमध्ये 3840 X 2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 43 इंच लांबीची अल्ट्रा HD 4K स्क्रीन देण्यात आली आहे. हे बेझल लेस डिझाइनवर बनवले आहे. या QLED स्मार्ट टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. तर, ग्राहकांच्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी विशेष ‘आय केअर मोड’ देखील देण्यात आला आहे. हा Google TV दोन बॉक्स स्पीकरसह येतो, जे एकूण 24W ऑडिओ आउटपुट प्रदान करतात. दोन्ही स्पीकर्स डॉल्बी ऑडिओ साउंड टेक्नॉलॉजीसह आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, गुगल टीव्ही असल्यामुळे गुगल कास्ट, व्हर्च्युअल रिमोट आणि व्हॉईस असिस्टंट सारखे फीचर्सही यात उपलब्ध आहेत. तुमच्या मोबाईल फोनचा कंटेंटही या टीव्हीमध्ये वायरलेस पद्धतीने पाहता येईल. त्याबरोबरच, 43-इंच लांबीचा Daiwa QLED 4K स्मार्ट टीव्ही प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिझनी+ हॉटस्टार आणि YouTube सारख्या प्री-लोडेड OTT ॲप्ससह येतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.