काय सांगताय? 40 इंच Android Smart TV फक्त 11 हजार रुपयांमध्ये उपलब्ध! पहा सर्वोत्तम ऑफर
Amazon वर सध्या टेलिव्हिजन डेज सेल सुरु आहे.
सेलदरम्यान VW चा 40 इंच लांबीचा Smart TV हा 11,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.
HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि BOBCARD द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 10% सूट
जर तुम्हीही बजेट किमतीत एक नवीन आणि मोठा Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. Amazon वर सध्या टेलिव्हिजन डेज सेल सुरु आहे. या सेलदरम्यान VW चा 40 इंच लांबीचा Smart TV हा 11,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एलईडी अँड्रॉइड टीव्ही आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात VW च्या 40 इंच Android Smart TV ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: Flipkart सेलमध्ये अगदी स्वस्तात मिळतोय Motorola चा लेटेस्ट महागडा स्मार्टफोन, पहा किंमत
VW चा 40 इंच Android Smart TV ची किंमत आणि ऑफर्स
VW चा हा फुल HD LED TV शॉपिंग साइट Amazon वर 11,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा Android TV खरेदी करताना, तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि BOBCARD द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 10% सूट मिळेल. येथे ग्राहकाला 10% दराने 1,199 रुपयांची सूट मिळेल. त्याचप्रमाणे, RBL, IDFC FIRST किंवा Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहारांवर कंपनी 7.5% ची सवलत मिळेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
VW चा हा स्मार्ट टीव्ही फ्रेमलेस डिझाइनवर तयार करण्यात आला आहे. या Android TV मध्ये 1920×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 40-इंच लांबीची फुल HD स्क्रीन आहे, जी 60Hz रिफ्रेश रेट आउटपुट देते. हा स्मार्ट टीव्ही क्वाड कोर प्रोसेसरवर चालतो ज्यामध्ये ॲप्स आणि डेटा डाउनलोड करण्यासाठी 8GB स्टोरेज देण्यात आली आहे. ऑडीओसाठी, यात 20W सराउंड स्पीकर प्रदान केले आहेत, जे टीव्हीमध्ये इनबिल्ट असतात आणि स्टिरिओ साउंड देतात. OTT ॲप्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात JioCinema, Prime Video, Hotstar, Netflix, Zee5, SonyLiv, Sun NXT, YouTube आणि AajTak इ. प्रीलोडेड आहेत.
या टीव्हीमध्ये स्क्रीन मिररिंग आणि पीसी कनेक्टिव्हिटीचा पर्याय देखील आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा Android फोन आणि लॅपटॉप देखील टीव्हीशी कनेक्ट करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी, या Android TV मध्ये 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि 1 ऑप्टिकल आउटपुट आहे. सेट टॉप बॉक्स, गेमिंग कन्सोल, हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह आणि इतर यूएसबी उपकरणेही याला जोडता येतात. याव्यतिरिक्त, Amazon वरून टीव्ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला तो आवडला नाही, तर ब्रँडकडून 10 दिवसांची रिप्लेसमेंट स्कीम देखील दिली जात आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile